पवित्र जागी अशांचे नावही घ्यायला नको; पंकजांचा रोख नेमका कोणाकडे?

राष्ट्रसंत भगवानबाबांचे जन्मस्थान सावरगाव घाटच्या भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडे (Pankaja munde) यांचा यंदाचा दसरा मेळावा (Dasara Melava) पार पडला.
Bjp Leader Pankaja Munde
Bjp Leader Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

सावरगाव : राष्ट्रसंत भगवानबाबांचे जन्मस्थान सावरगाव घाटच्या भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा यंदाचा दसरा मेळावा (Dasara Melava) पार पडला. दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती. ती परंपरा आता पंकजा मुंडे यांनी कायम ठेवली आहे. गतवर्षी कोरोनामुळे दसरा मेळावा ऑनलाईन पार पडला होता. यंदाही कोरोनाचे सावट असल्याने हा मेळावा कसा होणार? याकडे मुंडे समर्थांचे लक्ष लागले होते. पण पोलिसांनी कोरोना प्रतिबंधक नियम आणि अटी घालून या मेळाव्याला परवानगी दिली होती.

Bjp Leader Pankaja Munde
''माझ्या जीवात जीव असेपर्यंत पंकजा मुंडेंना सोडणार नाही : महादेव जानकर

आजच्या मेळ्याव्यात भाषणादरम्यान पंकजा मुंडे यांचा तोच आक्रमकपणा पुन्हा दिसून आला. मात्र काही नेत्यांची नाव घेणे त्यांनी टाळल्याने त्यांचा रोख नेमका कोणाकडे असा प्रश्न विचारला जात आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, "मी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. माझ्यामागे मुंडे साहेबांची किर्ती आणि भगवानबाबांची मूर्ती आहे. त्यामुळे हे अत्यंत पवित्र स्थान आहे. म्हणून असा कोणताही शब्द मी उच्चारणार नाही किंवा या स्थानावर ज्या व्यक्तीचा उल्लेख केल्याने भगवान बाबांची मान खाली जाईल, अशा कोणत्याही व्यक्तीचा मला उल्लेख करायचा नाही. अशा कोणत्याही प्रवृत्तीचाही मला उल्लेख करायचा नाही.

Bjp Leader Pankaja Munde
पंकजा मुंडे म्हणाल्या, माझे दरवाजे तुमच्यासाठी चोवीस तास उघडे, पण..

या भाषणानंतर पंकजा यांचा रोख नेमका कोणाकडे होता असा प्रश्न विचारला जात आहे. जेव्हा सामाजिक न्यायमंत्री आणि पंकजांचे बंधू धनंजय मुंडे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी देखील हा रोख कोणाकडे होता हे आपल्याला माहित नसल्याचे सांगत या प्रश्नाचे उत्तर पंकजा यांनाच विचारा असे म्हंटले. त्यामुळेच त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com