Parth Pawar Sharad Pawar
Parth Pawar Sharad Pawarsarkarnama

Parth Pawar Meet Sharad Pawar : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीपूर्वी पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला, नेमकं कारण काय?

NCP Sharad Pawar : सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. त्यापूर्वी पार्थ पवार हे शरद पवार यांना भेटण्यासाठी दाखल झाले आहेत.
Published on

Sharad Pawar News : सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, या विषयी आपल्याला काही माहीत नसल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केली होते. पवारांच्या या वक्तव्याच्या अवघ्या दोन तासात पार्थ पवार हे शरद पवारांना भेटण्यासाठी गोविंद बाग येथे दाखल झाले आहेत. ही भेट नेमकी कशासाठी घेत आहेत हे स्पष्ट होऊ शकले नाही.

शरद पवार यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सुनेत्रा पवार शपथ घेणार याची मला माहिती नाही. सुनील तटकरे, प्रफुल पटेल हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलं आहे. त्यावर आम्ही काही भाष्य करणार नाही.

12 तारखेला घोषणा होणार होती

अजित पवारांसोबत दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती. १२ तारखेला याबाबतची घोषणा होणार होती. मात्र, त्याआधीच हा मोठा अपघात झाला, असे शरद पवार यांनी सांगितले.

विलीनीकरणाची जबाबदारी जयंत पाटलांवर

विलीनीकरणाबाबत आपल्या जबाबदारी देण्यात आली होती, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. अजित पवार आणि आपल्या चार बैठका देखील झाल्या होत्या. अजितदादांची इच्छा होती की दोन्ही पक्षांनी एकत्र यावं. आम्ही पवारसाहेबांच्यासोबत देखील बैठक झाली होती. 12 तारखेला एका बाबत आम्ही घोषणा करणार होतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com