

Kolhapur, 21 May : करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील सुमारे 25 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी 32 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. यामध्ये अध्यक्षांसह 25 संचालकांचा समावेश आहे. त्यांच्यावर दोषारोपपत्र निश्चित करण्यात आले असून प्रत्येकाला 80 लाख ते सव्वा कोटीपर्यंतची जबाबदारी निश्चित केली आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील अपहारप्रकरणी माजी अध्यक्षांसह संचालक अशा २५ जणांवर दोषारोप पत्र दाखल केले आहे. या सर्वांची सुनावणी २७ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता शहर उपनिबंधक सहकारी संस्था येथे होणार आहे. त्यामुळे स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत खुलासे व पुरावे सादर करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. चौकशी अधिकारी तथा उपनिबंधक शहर डॉ. प्रिया दळणर यांनी या नोटीसा पाठविल्या आहेत..
करवीर येथील पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेत २०१९ ते २०२४ या कालावधीत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार आणि अपहार झाला आहे. या प्रकरणी सहकार विभागाने मोठी कारवाई केली. अपहाराची जबाबदारी माजी अध्यक्ष, मानद सचिव, संचालक मंडळ आणि कर्मचारी अशा एकूण २५ जणांवर ठेवली आहे. त्यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आले आहे.
कर्ज वाटपातील गैरप्रकार, ठेव तारण कर्जात संस्थेत कोणतीही ठेव जमा नसताना बनावट ठेव तारण कर्ज उचलून वैयक्तिक लाभ घेतल्याचे समोर आले आहे. या कारवाईमुळे सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि सामान्य सभासदांच्या पैशाचे रक्षण होईल, असा विश्वास वाढला असल्याचे ठेवीदारांनी सांगितले.
अहवालात धक्कादायक बाबी
केडीसी बँक लक्ष्मीपुरी शाखेत रोख, धनादेश, शिल्लक, बनावट नोंदी करून पैशाचा अपहार
बनावट कर्ज प्रकार, नियमित आणि आकस्मिक कर्जाच्या रकमांमध्ये फेरफार
ठेवीदारांच्या ठेवी हिशेबात न ठेवणे, दाम दुप्पटीचे बनावट व्यवहार
बनावट तारण कर्ज उचलून व्यक्तिगत लाभ
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.