4000 crore's Scam : 'मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 4000 कोटींचा गैरव्यवहार; एकाच कुटुंबात 130 गाळ्यांचे वितरण'

MLA Mahesh Shinde News : एक गाळा एक हजार स्क्वेअर फूट असून रेडिरेकनरप्रमाणे त्याची किंमत नऊ कोटी रुपये असताना हे गाळे पाच लाख रुपये किमतीने विकण्यात आले. हे गाळे तत्कालीन संचालक व व्यापारी यांनाच विकण्यात आले. प्राप्त माहितीनुसार एकाच कुटुंबामध्ये 130 गाळ्यांचे वितरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे.
Mahesh Mane
Mahesh ManeSarkarnama
Published on
Updated on

Satara, 14 April : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2014 मध्ये तत्कालीन संचालकांनी शेतकऱ्यांसाठी राखीव असणाऱ्या भूखंडाचा गैरवापर करून 466 गाळ्यांची विनापरवानगी बांधकाम करून त्याची परस्पर विक्री केली आहे. हा गैरव्यवहार 137 कोटी रुपयांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात हा गैरव्यवहार 4000 कोटी रुपयांचा आहे, असा सनसनाटी आरोप कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केला आहे.

या संदर्भात तत्कालीन संचालकांनी उच्च न्यायालयामध्ये (High Court) या विषयासंदर्भात ना हरकत आदेश मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार देऊन पणन संचालकांना संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सातारा (Satara) येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी या गैरव्यवहाराबाबतची माहिती दिली.

महेश शिंदे म्हणाले, विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने (Mumbai Market Committee) केलेल्या गैरव्यवहाराची माहिती आपण मांडली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनासुद्धा या प्रकरणाची माहिती दिली, त्यावेळी त्यांनी आपणास योग्य वाटेल ती भूमिका घ्यावी, असे सांगितल्याचे शिंदे यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahesh Mane
Pawar PC In Akluj : मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा संदेश राज्यभरात जाईल; शरद पवारांचे सूचक विधान

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांच्या शेतीमाल विक्रीसाठी 72 हेक्टरचा भूखंड वितरित करण्यात आला होता. पैकी काही भूखंडावर 466 गाळे विनापरवानगी बांधण्यात आले. एक गाळा एक हजार स्क्वेअर फूट असून रेडिरेकनरप्रमाणे त्याची किंमत नऊ कोटी रुपये असताना हे गाळे पाच लाख रुपये किमतीने विकण्यात आले. हे गाळे तत्कालीन संचालक व व्यापारी यांनाच विकण्यात आले. प्राप्त माहितीनुसार एकाच कुटुंबामध्ये 130 गाळ्यांचे वितरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळामध्ये हे प्रकरण उघडकीस आले होते, त्यावेळी त्यांनी पणन संचालकांना चौकशीचे आदेश दिले होते. तत्कालीन संचालक प्रभू पाटील यांनी हा गैरव्यवहार उघडकीस आणला होता, त्यावेळी बाजार समितीचे चेअरमन बाळासाहेब सोळसकर संचालक शशिकांत शिंदे, प्रदीप खोपडे, संजय पानसरे, बापू भुजबळ यांसह अन्य संचालकांनी हा गैरव्यहार केल्याचे महेश शिंदे यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते नितीन बोर्डे यांनी 2013- 14 मध्ये हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सैनिक यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात 138 कोटी रुपयांचा अपहार झाला असून हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, अशी शिफारस अहवालात करण्यात आली होती. मात्र, या अहवालावरसुद्धा तत्कालीन संचालकांनी स्टे घेतला. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्याची जागा उपलब्ध होती, त्या ठिकाणी चटई क्षेत्रात गाळे बांधून त्यामध्ये चार हजार कोटींचा गैरव्यवहार करण्यात आला आहे, असा आरोप शिंदे यांनी केला.

Mahesh Mane
Sule Attack On Govt : गोळीबार सरकारच्या नेत्यांचा गुन्हेगारीला आशीर्वाद; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

मार्केट कमिटीची जागा ही इंडस्ट्रियल क्षेत्र म्हणून दाखवण्यात आले. मात्र, मार्केट कमिटीची जागा औद्योगिक क्षेत्र असूच शकत नाही. रेडिरेकनरनुसार गाळ्याची किंमत नऊ कोटी रुपये असताना नाममात्र पाच लाखांत गाळे कसे विकले जाऊ शकतात, असा सवालही त्यांनी केला हायकोर्टाने 19 मार्च 2024 रोजी पणन संचालकांना या प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश दिले आहेत, त्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, हे गाळे ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना देण्यात यावेत आणि यासंदर्भात जोपर्यंत न्याय होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे.

तत्कालीन संचालकांनी या प्रकरणी कोर्टात जाऊन ना हरकत आदेश मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हायकोर्टाने संबंधित प्रकरणात स्टे देण्यास नकार दिला आहे. याबाबतचे आदेश 12 एप्रिल रोजी देण्यात आले आहेत, असे शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले. संबंधित संचालकांकडून गाळे काढून घेऊन ते शेतकऱ्यांना देण्यात यावेत, हीच आमची भूमिका असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

Mahesh Mane
Solapur Politics : पवार-शिंदे, मोहिते पाटलांमध्ये ‘शिवरत्न’वर खलबतं; धनाजी साठे, नारायण पाटलांचीही हजेरी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com