Sangola Politic's : शेकापची 50 वर्षांची सत्ता संपुष्टात; सांगोल्यात भाजपचा सभापती, दीपक साळुंखेंची ऐनवेळी पलटी

Panchayat Samiti Sabhapati Election : सांगोला पंचायत समितीत दीपक साळुंखे गट भाजपमध्ये गेल्याने शेकापची 50 वर्षांची सत्ता संपली. भाजपच्या पूनम इंगवले सभापती, तर शिवसेनेचे अजय सरगर उपसभापती म्हणून निवडून आले.
Sangola Panchayat Samiti Sabhapati
Sangola Panchayat Samiti Sabhapatisarkarnama
Published on
Updated on

Sangola, 12 March : सांगोला पंचायत समितीच्या निवडणुकीत शेतकारी कामगार पक्षासोबत आघाडी करून तीन सदस्य निवडून आलेल्या माजी आमदार दीपक साळुंखे गटाने ऐनवेळी पलटी मारल्याने शेतकरी कामगार पक्षाची सुमारे ५० वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. मुंबईतील राजकीय घडामोडीनंतर साळुंखे गटाच्या तीन सदस्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे भाजपच्या पूनम इंगवले सभापती, तर शिवसेनेचे अजय सरगर हे उपसभापती बनले.

सांगोला (Sangola) तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत पंचायत समितीवरील शेतकरी कामगार पक्षाची जवळपास पन्नास वर्षांची सत्ता अखेर संतूष्टात आली आहे. तालुक्यात झालेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर महायुतीने पंचायत समितीवर सत्ता स्थापन केली असून भाजपच्या पूनम इंगवले यांची सभापती तर शिवसेनेचे अजय सरगर यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष (PWP Party) आणि माजी आमदार दीपक साळुंखे गटाची आघाडी झाली होती. या आघाडीला पंचायत समितीमध्ये नऊ जागा मिळाल्या होत्या विरोधातातील शिवसेना-भाजप युतीला फक्त पाच जागांवर समाधान मानावे लागले होते.

शेकाप आणि साळुंखे गटाची आघाडी सत्तेवर येणार, असे काही दिवसांपर्यंतचे चित्र होते. मात्र मागील काही दिवसांपासून मुंबईत जोरदार घडामोडी घडत होत्या. दीपक साळुंखे हे पालकमंत्री जयकुमार गोरेंशी मुंबईत वाटाघाटी करत होते. त्यात यश आल्यानंतर साळुंखे गटाच्या तीन सदस्यांनी मुंबईमध्ये बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे आघाडीची संख्या नऊवरून सहावर आली, तर भाजप-शिवसेनेची सदस्यसंख्या आठवर गेली. त्यामुळे पंचायत समितीच्या सत्तेचे गणित पूर्णपणे बदलले.

Sangola Panchayat Samiti Sabhapati
Mohite Patil VS BJP : मोहिते पाटलांची मोठी खेळी : दोन सदस्यांच्या शिंदेसेनेला सभापतिपद, पालकमंत्र्यांना शह देण्याचा डाव

सभापतिपदासाठी भाजपच्या पूनम इंगवले, तर शेकापकडून काजल काशीद यांनी, तर उपसभापतिपदासाठी शिवसेनेचे अजय सरगर यांनी, तर शेकापकडून छाया कोळेकर यांनी अर्ज दाखल केला होता. मतदानाच्या वेळी महायुतीच्या आठ सदस्यांनी इंगवले आणि सरगर यांच्या बाजूने हात वर करत विजय निश्चित केला. त्यामुळे आठ विरुद्ध सहा अशा फरकाने सांगोला पंचायत समितीवर प्रथमच महायुतीची सत्ता स्थापन झाली आणि शेकापचे दीर्घकाळ टिकलेले वर्चस्व संपुष्टात आले.

गणपतआबांच्या निधनानंतर शेकापला दुसऱ्यांदा अपयश

(स्व) गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही शेकापला सत्ता मिळविता आली नव्हती. ऐन वेळेच्या युती-आघाडीचा फटका नगरपरिषदेत निवडणुकीत शेकापला बसला होता. त्या निवडणुकीत शिवसेनेने नगराध्यक्षपद मिळवत नगरपालिकेवर सत्ता स्थापन केली होती. आता पंचायत समितीवरील सत्ता गमावल्याने सांगोल्यात शेकापचे राजकीय वर्चस्व ढासळत असल्याचे चित्र आहे.

Sangola Panchayat Samiti Sabhapati
Sabhapati Election : गोरेंच्या रणनीतीने सोलापुरातून राष्ट्रवादी हद्दपार : 10 पंचायत समित्यांवर भाजपचा झेंडा, शिंदेसेनेला एका ठिकाणी यश

भाजपने सभापती करून दाखवला

पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचा केवळ एकच सदस्य निवडून आला आहे. पण साळुंखे गटाचे तीन सदस्य भाजपत दाखल झाल्याने भाजपची ताकद चारवर गेली. शिवसेनेचे चार सदस्य मिळून महायुतीकडे आठ सदस्य झाले आणि त्याच बळावर भाजपने सभापतिपद पटकावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com