Sabhapati Election : गोरेंच्या रणनीतीने सोलापुरातून राष्ट्रवादी हद्दपार : 10 पंचायत समित्यांवर भाजपचा झेंडा, शिंदेसेनेला एका ठिकाणी यश

Solapur District Panchayat Samiti Sabhapati : सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी 10 पंचायत समित्यांवर भाजपची सत्ता आली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या रणनीतीमुळे राष्ट्रवादीचा गड ढासळला आणि भाजपने जिल्ह्यात मोठे राजकीय वर्चस्व मिळवले.
Solapur Sabhapati Election
Solapur Sabhapati Election Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 March : सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी तब्बल 10 पंचायत समित्यांवर भारतीय जनता पक्षाचे सत्ता आली आहे. वास्तविक निवडणुकीत भाजपला सात पंचायत समित्यांमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले होते. पंढरपुरात दोन्ही बाजूकडे समान संख्याबळ असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी भाजपला पाठिंबा दिला, तर सांगोल्यात केवळ एक सदस्य असतानाही भाजपने सभापतिपद मिळविले आहे, करमाळ्यात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसची युती होती, त्याठिकाणीही भाजपचा सभापती झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा गड उद्‌ध्वस्त करून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपला 10 ठिकाणी सत्ता मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ, बार्शी, मंगळवेढा, माढा या सात पंचायत समितीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यामुळे या सात ठिकाणी, तर तसेच करमाळ्यात भाजप आणि राष्ट्रवादीची युती होती, त्यामुळे या ठिकाणीही भाजपचा सभापती होणार, हे उघड होते.

पंढरपूर, सांगोल्यात भारतीय जनता पक्षाने कमाल केली आहे. पंढरपुरात भाजप (BJP) आणि विरोधातील दोन्ही राष्ट्रवादी, भालके गटाकडे प्रत्येकी आठ जागा होत्या, त्यामुळे सभापती कोणाचा होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. मात्र, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी संयमाने पावले उचलत भाजपचा सभापती केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा पूर्वाश्रमीचे परिचारक गटातील वसंतराव देशमुख यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. देशमुख हे मोहिते पाटील समर्थक म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या सूचनेनंतर देशमुख यांनी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सांगोल्यात भारतीय जनता पक्षाचा एकच सदस्य निवडून आला होता. मात्र, निवडणुकीत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख गटासोबत युती करून तीन सदस्य निवडून आलेल्या माजी आमदार दीपक साळुंखे यांनी ऐन वेळी भूमिका बदलली, त्यामुळे केवळ एक सदस्य असूनही सभापतिपद मिळविण्याची किमया गोरेंनी करून दाखवली आहे.

Solapur Sabhapati Election
North Solapur Sabhapati : उत्तर सोलापूरचे सभापतिपद भाजपचे शहाजी पवार गटाकडे; तर उपसभापतिपद यशवंत माने गटाकडे

माळशिरसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बहुमत असतानाही मोहिते पाटील यांनी शिंदेसेनेत गेलेल्या आपल्या कट्टर समर्थकाला सभापती करून पवारांच्या राष्ट्रवादीला सभापतिपदापासून दूर ठेवले आहे, त्यामुळे मोहिते पाटलांच्या तिरक्या चालीची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

सोलापूर जिल्हा हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला हेाता. बहुतांश पंचायत समित्यांवर या दोन्ही पक्षाची सत्ता असायची. पण आज एकाही पंचायत समितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती नाही. त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला उद्‌ध्वस्त केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पक्षनिहाय सभापती आणि उपसभापती पुढीलप्रमाणे

१) अक्कलकोट (भाजप)

सभापती : रश्मी सागर हिप्परगी

उपसभापती : सागर सिध्दप्पा कल्याणशेट्टी

२) दक्षिण सोलापूर (भाजप)

सभापती : संदीप अमृत टेळे

उसभापती : सौ वर्षा सोमनाथ पटणे

३) उत्तर सोलापूर (भाजप)

सभापती : तेजस्विनी अमोल बोराडे

उपसभापती : सुनील दगडू भोसले

४) मोहोळ (भाजप)

सभापती : अस्लम गफूर चौधरी

उपसभापती : उलका राजकुमार पाटील

५) बार्शी (भाजप)

सभापती : मीनाक्षी मुरलीधर रोंगे

उपसभापती : संतोष चंद्रकांत निंबाळकर

६) करमाळा (भाजप-राष्ट्रवादी)

सभापती : पूजा सचिन ढेरे

उपसभापती : अजिनाथ सर्जेराव विघ्ने (राष्ट्रवादी)

७) माढा (भाजप)

सभापती : पंडित तुकाराम देशमुख

उपसभापती : स्वाती हनुमंत गिड्डे (भाजप पुरस्कृत अपक्ष)

८) मंगळवेढा (भाजप)

सभापती : दीपाली आनंद ताड

उपसभापती :अर्जुन तुकाराम मल्लाळे

९) सांगोला (भाजप-शिवसेना)

सभापती : पूनम सुदर्शन इंगवले

उपसभापती : अजय उत्तम सरगर (शिवसेना)

Solapur Sabhapati Election
Pandharpur Sabahapati : मोहिते पाटील समर्थकाच्या मदतीने पंढरपुरात भाजपचा सभापती; राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांची परिचारकांशी हातमिळवणी

१०) पंढरपूर (भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)

सभापती : शुभम सुरेश आगावणे

उपसभापती : प्रमोद हरी देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)

११) माळशिरस (शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)

सभापती : दत्तात्रेय रावसाहेब मगर (शिवसेना)

उपसभापती : मनीषा अमोल पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com