Tarali Project : अदानी समूहाला मोठा धक्का! पाटणमधील तारळी जलविद्युत प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश

Forest Department Action Adani Tarali Project : तारळी येथे अदानी समूहाकडून पम्प्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, या प्रकल्पासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची आवश्यक पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच वनविभागाच्या आवश्यक परवानग्यांशिवाय प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वनविभागाने या प्रकल्पाच्या कामावर कारवाई केली आहे.
Adani Tarali Project | Forest Department Action | Satara
Adani Tarali Project | Forest Department Action | SataraSarkarnama News
Published on: 
Updated on: 

Satara News, 17 Nov : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळी येथे अदानी समूहाकडून उभारण्यात येत असलेल्या पम्प्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश वनविभागाने दिले आहेत. आवश्यक परवानग्या न घेताच प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे वनविभागाच्या तपासणीत आढळून आले आहे. याप्रकरणी पाटण वनक्षेत्रपाल कार्यालयाने संबंधित कंपनीला नोटीस बजावली आहे.

तारळी येथे अदानी समूहाकडून पम्प्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, या प्रकल्पासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची आवश्यक पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच वनविभागाच्या आवश्यक परवानग्यांशिवाय प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वनविभागाने या प्रकल्पाच्या कामावर कारवाई केली आहे.

पाटण वनक्षेत्रपाल कार्यालयाकडून संबंधित कंपनीला बजावण्यात आलेल्या नोटिशीत प्रकल्पाचे सर्व काम तात्काळ बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच तीन दिवसांच्या आत या प्रकरणी लेखी खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या परवानग्यांची कागदपत्रेही सादर करण्याचे निर्देश वनविभागाने दिले आहेत.

Adani Tarali Project | Forest Department Action | Satara
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरु; महिलांची धावपळ

दरम्यान, तारळी येथील या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच विरोध होत आहे. अभिनेते सयाजी शिंदे आणि सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद पाटील यांनीही या प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पर्यावरणाच्या मुद्द्यावरून या प्रकल्पाबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच आता वनविभागाने काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

Adani Tarali Project | Forest Department Action | Satara
Solapur Dcc Bank : चौकशीवेळी ते 6 बडे नेते सोलापूर Dccचे संचालक होते : हायकोर्टाचे निरीक्षण, विशेष अनुमती याचिकेवर तातडीच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीशांना भेटणार

त्यामुळे अदानी समूहाच्या तारळी पम्प्ड स्टोरेज प्रकल्पासमोरील अडचणी वाढल्या आहेत. वनविभागाने बजावलेल्या नोटिशीला कंपनी काय उत्तर देते, आवश्यक परवानग्या सादर करते का आणि प्रकल्पाचे काम पुन्हा कधी सुरू होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.