अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला.
अपघातानंतर विमानाचा स्फोट झाला आणि गोजुबाबी येथील गावकरी घटनास्थळी जमा झाले असताना दुसरा स्फोट झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
या घटनेबाबत काहींकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Pune News : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. बारामती विमानतळावर झालेल्या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला होता. या अपघाताची माहिती पसरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेनंतर हा अपघात होता की की घातपात? असा संशय राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आमदार रोहित पवार, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, रामदास कदम यांनी देखील व्यक्त केला आहे.
अशात सध्या विमान अपघाताचा तपास DGCA करत असून त्याचा अहवाल लवकरच येण्याची शक्यता आहे. याच दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडीओ समोर आला असून थरकाप उडवणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सध्या हा प्रचंड व्हायरल होत असून हा व्हिडीओ विमान कोसळल्यानंतरचा असल्याचे बोलले जात आहे. तर हा व्हिडीओ एका स्थानिक नागरिकाने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
बारामती तालुक्यातील बारामती विमानतळा जवळ असणाऱ्या गोजुबावी येथे २८ जानेवारी रोजी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. ज्यात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्दैवी विमान दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. तर या अपघातानंतर येथे आसपासच्या परिसरातील नागरिकांनी दाव घेतली होती. पण विमान कोसळताच भीषण आग लागल्याने विमाना जवळ कोणालाच जाता येत नव्हते.
यावेळी आगीच्या ज्वाळा उसळत होत्या. त्याचवेळी घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी अचानक पुन्हा एक जोरदार स्फोट झाल्याचे सांगितले. या घटनेचा आता थरारक व्हिडिओ समोर आला असून जोरदार स्फोट झाल्याचे दिसत आहे.
कोसळलेल्या विमानात आगीच्या ज्वाळा उसळल्या असतानाच परिसरात धुराचे लोट पसरले असतानाच विमानातून मोठ्या आवाजात स्फोट झाला. ज्यानंतर आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तर या अपघातानंतर प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला. सध्या या विमान दुर्घटनेची संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे.
तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पत्रकार परिषद घेत सेकंद आणि सेकंदाची माहिती उघड करत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच त्यांनी विमान अपघातात घातपाताचा संशय व्यक्त केला होता.
1. विमान अपघात कधी आणि कुठे झाला?
२८ जानेवारी रोजी बारामती येथे हा अपघात झाला.
2. अपघातानंतर काय घडले?
विमान कोसळल्यानंतर स्फोट झाला आणि त्याचे तुकडे सर्वत्र विखुरले.
3. दुसरा स्फोट कधी झाला?
गावकरी घटनास्थळी जमले असताना आणखी एक स्फोट झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
4. या घटनेबाबत कोणता संशय व्यक्त केला जात आहे?
काहींकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
5. व्हिडीओबाबत काय स्थिती आहे?
सदर व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.