Ajit Pawar News : सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी आमच्यावर दबाव होता, पण... अजितदादा स्पष्टच बोलले

NCP News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापूरमध्ये सभा झाली.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama

Kolhapur Sabha News : सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी आमच्यावर दबाव होता. तो दबाव म्हणजे बहुजनांची सर्वसामान्यांची कामं करण्याचा दबाव होता. आम्ही अडीच वर्ष सरकामध्ये होते, महाविकास आघाडीचे सरकार पडले. तेव्हा आमदारांच्या कामांवर स्थगिती आली होती. ती स्थगिती उठवण्याचा दबाव होता, असे सांगून शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालो, त्याचे समर्थन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

अजित पवार यांची उत्तरदायित्व सभा कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे झाली. यावेळी अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राला माहिती आहे. मी जे बोलतो ते खरे बोलतो. आमच्या विषयी अनेक जण विनाकारण बदनामी करतात, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सरकार ज्या दिवशी पडत होते, त्याच दिवशी सगळ्या राष्ट्रवादीच्या (NCP) आमदारांनी सह्या केल्या होत्या आणि सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला होता, हे खोटे असले तर मी राजकारण सोडेन.

Ajit Pawar News
Chitra Wagh News : मोदींच्या नेतृत्वावर जगाने शिक्कामोर्तब केल्याने ठाकरेंचा जळगावात जळफळाट ; वाघ चवताळल्या

मी आणि माझे सर्व सहकारी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था चांगली राहावी. त्या कामाला आम्ही वाहून घेतले आहे. आम्ही सरकारमध्ये नव्हतो, त्यामुळे काही कामे करता येत नव्हती. तरुण-तरुणींच्या हाताला काम मिळाली पाहिजे, फक्त भाषण करून कामं होत नाहीत. पैसे देण्यासाठी सत्तेत गेलो आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी आम्ही महायुतीमध्ये गेलो नाही. आम्ही कुणाच्या दबावाल भीक घालत नाही, आम्ही पण शेतकऱ्यांची मुल आहोत, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

कोल्हापूर हे पुरोगामी विचारांचे शहर आहे. 100 वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी केलेले कार्य हे आमच्यासाठी प्रेरणा देणारं आहे. सारथीच्या निमित्ताने आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सुविधा देत आहोत. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना ही सेवा देत आहोत. राज्यात कुठेही जातीय सलोखा बिघडू नये समाजकार्याला आम्ही वाहून घेतले आहे. हैदराबादमध्ये ज्या पद्धतीने आयटी कंपन्या आहेत. त्या पद्धतीचे वातावरण कोल्हापुरात करावे लागले.

Ajit Pawar News
Maratha Mahasangha aggressive : शिंदे फक्त ‘कुंकवाचा धनी’, पुढच्या निवडणुकीत मराठा नेत्यांना पाडणार मराठा महासंघ !

राज्याचा सर्वाधिक विकास कशा पद्धतीने होईल यावरच आमचे लक्ष आहे. मधल्या काळात शेतकऱ्यांना दिलेल्या अनुदानाचा हप्ता अजून काही शेतकऱ्यांना मिळायचा आहे. शेतकऱ्यांची यादी तयार करून जेवढे शेतकरी वंचित राहिले त्यांना सर्वांना लवकरात लवकर अनुदान देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. मी अर्थमंत्री आहे, माझा दिवस सकाळी सहा वाजता चालू होतो. मी दिवसभर लोकांसाठी काम करतो. मी नकारात्मक राजकारण करत नाही, असेही पवार यांनी सांगितले.

संधी मिळाल्यानंतर लोकांची कामे केली पाहिजेत. लोकांची कामे करण्यासाठी आम्ही महायुतीमध्ये सामील झालेलो आहोत. पण काही लोक आमची बदनामी करत आहेत. मी नुसत्या गप्पा मारत नाही. कोल्हापूरकरांनी दाखवलेला पुरोगामी विचारांचा वारसा मी यापुढेही जपेन. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा जपेल. सत्ता ही बहुजनांच्या प्रगतीसाठी महत्त्वाची असते लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी महत्त्वाची असते. महाराष्ट्रातल्या तमाम बहुजन समाजाला मी न्याय देण्यासाठी सत्तेचा वापर करेल, असे आश्वासन देतो, असेही अजित पवार म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com