Malegaon Sugar Factory Result : अजितदादांचा विजय अपेक्षितच; पण पॅनेलच्या विजयाची उत्सुकता वाढली, ‘माळेगाव’ गटातील मतमोजणी सुरू

Baramati Political News : ब वर्ग गटातील निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी अ वर्ग गटातील सर्व मतपत्रिकांचे गठ्ठे एकत्र केले असून सध्या माळेगाव गटातील मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. हा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे आता बारामतीकरांचे डोळे लागले आहेत.
Malegaon Sugar Factory Result-Ajit Pawar
Malegaon Sugar Factory Result-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati, 24 June : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक मतमोजणीत ‘ब’ वर्ग गटातून (सोसायटी गटातून) उपमुख्यमंत्री अजित पवार अपेक्षेप्रमाणे मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत. सोसायटी मतदारसंघातील सर्व सहकारी संस्था ह्या उपमुख्यमंत्री पवारांच्या ताब्यात आहेत, त्यामुळे अजितदादा निवडून येणार हे अपेक्षित होते. मात्र, खरी चुरस ही खुल्या गटात असणार आहे, त्यामुळे अजितदादांनी जरी विजयाचे खाते उघडले असले तरी पॅनेलच्या विजयाची उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, ब वर्ग गटातील निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी अ वर्ग गटातील सर्व मतपत्रिकांचे गठ्ठे एकत्र केले असून सध्या माळेगाव गटातील मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. हा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे आता बारामतीकरांचे डोळे लागले आहेत. कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) पॅनेलला चंद्रराव तावरे यांच्या पॅनेलने जोरदार टक्कर दिली आहे. शेवटची सभा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी (Malegaon Sugar Factory Election) स्थापनेपासून प्रथमच मोठी चुरस पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या सर्व निवडणुका ह्या चंद्रराव तावरे-रंजन तावरे विरुद्ध पवार अशाच झाल्या आहेत. प्रत्येक वेळी सभासदांना आलटून पाटलून दोघांनाही संधी दिलेली आहे. मात्र, या वेळी प्रथमच चार पॅनेल माळेगावच्या निवडणुकीत उतरले आहेत, त्यामुळे माळेगावची सत्ता कोणाला मिळणार, याची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पॅनेल, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा, चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचा तसेच एक अपक्षाचा पॅनेल, असे चार पॅनेल माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवत आहेत. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलकडून माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्यासह विद्यमान बहुतांश संचालकांना संधी दिली आहे, त्यामुळे माळेगावमध्ये काही लक्षवेधी लढत होत आहेत.

Malegaon Sugar Factory Result-Ajit Pawar
Ajit Pawar: 'माळेगाव'मध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या पॅनलने खाते उघडले; स्वतः अजितदादा 81 मतांनी विजयी

दुसरीकडे, विरोधी चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या पॅनेलमधून अनेक मातब्बर आपले नशीब आजमावत आहेत. खुद्द चंद्रराव तावरे हे माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत. तसेच, रंजन तावरे यांनीही चेअरमनपद भूषविले आहे, त्यामुळे अनेक माजी चेअरमनचा कस या निवडणुकीत लागलेला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पॅनेलमधून ज्येष्ठांबरोबर तरुणांना सर्वाधिक संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद कोणाला कौल देतात, हे पाहावले लागणार आहे.

Malegaon Sugar Factory Result-Ajit Pawar
Jayashree Patil : भाजपचा मास्टरस्ट्रोक! एकाच नेत्याचा प्रवेश अन् काँग्रेसला घरघर?

पवारांचा पॅनेल कोणाची मते घेणार यावर विजयाचे गणित अवलंबून

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत चार पॅनेल उतरले आहेत. एरव्ही तावरे विरुद्ध पवार अशी लढत होत असते. आता मात्र, पवारांचे दोन पॅनेल आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पॅनेल कोणाची मते घेणार, त्यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे. पवारांचा पॅनेल कोणाची मते खाणार, त्यावरच विरोधी पॅनेलच्या विजयाचे भवितव्य असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com