Ashok Kharat : अशोक खरातची सोलापूरवर नजर; तब्बल 11 एकर जमिनीची खरेदी, शक्तीपीठमधून जादा मोबदल्यासाठी लावली आंब्याची झाडे

Land Purchas Issue : अशोक खरात प्रकरणात 11 एकर जमीन खरेदी व जादा मोबदल्यासाठी आंब्याची झाडे लावल्याच्या आरोपामुळे सोलापूरमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे.
Ashok kharat-kalpana kharat
Ashok kharat-kalpana kharatSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 April (संदीप गायकवाड) : अशोक खरात याच्या मुलीला माजी आमदार दीपक साळुंखे यांनी तीस लाखांहून अधिक किमतीचा प्लॅट भेट दिल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केल्यानंतर त्याचे सोलापूर कनेक्शन उघड झाले होते. आता खरात याने उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण शिवारात तब्बल ११ एकर जमीन खरेदी केल्याची माहिती पुढे आली आहे. ही जमीन नियोजित शक्तीपीठ महामार्गासाठी संपादीत करण्यात येणार होती. विशेष म्हणजे जादा मोबदला मिळविण्यासाठी त्याने त्या जमिनीत आंब्याची झाडे लावली आहेत.

प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्यातून जाणार होता. त्याबद्दल अशोक खरातला माहिती मिळाली. खरात याचे लागेबांध सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असल्याने त्याला महामार्गाच्या रेखांकनाबद्दल माहिती मिळाली होती, असा दावा केला जात आहे.

त्या माहितीच्या आधारेच उत्तर सोलापूर तालुक्याच्या कळमण हद्दीतील रणजित ब्रह्मचारी कोल्हाळ यांच्या मालकीची ११ एकर जमीन २८ मार्च २०२४ रोजी अशोक खरात (Ashok Kharat) आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांनी खरेदी केली आहे. तशी नोंद कळमण हद्दीतील महसूली दफ्तरी आढळून येते.

शक्तीपीठ महामार्गात जमीन संपादित होणारे हे माहित असल्यामुळे खरात अधिक मोबदला मिळावा; म्हणून त्या क्षेत्रात दहा ते बारा फूट उंचीची आंब्याची झाडे आणून लावले आहेत. डाळिंब पिकाची नोंद सातबारा उताऱ्यावर लावून घेतल्याचेही निष्पन्न झाले आहे.

Ashok kharat-kalpana kharat
Gore Vs Shinde : जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंवर पलटवार : दिल्लीत राहून DPCचा निधी कसा मिळेल?; त्यासाठी सोलापुरात राहावे लागते

राजकारण्यांपासून बड्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना आपल्या मोहजालात ओढणाऱ्या अशोक खरात याने फसवणुकीतून मिळवलेला पैसा असा अनेक ठिकाणी गुंतवल्याचे पुढे येत आहे. शिर्डीतही त्याची जमीन असल्याचे चौकशीतून पुढे आले होते.

नाशिकमध्ये भोंदूगिरी करणाऱ्या अशोक खरात याने मंत्रालयातील आपल्या लागेबांध्याचा उपयोग करून महामार्गात जाणारी अगोदरच खरेदी करून ठेवली होती. म्हणजेच भ्रष्टाचाराची पाळेमुळे कुठपर्यंत रुजली आहेत. याचा प्रत्यय अशोक खरात याच्या कळमणमधील जमीन खरेदीवरून येतो.

Ashok kharat-kalpana kharat
Ashok Kharat : दोन-तीन बड्या नेत्यांच्या फोटोवर फुली ; आता थेट दिल्लीतून अशोक खरातच्या विरोधात तगडी केस उभी करण्याच्या हालचाली..

अशोक खरात याच्या प्रमाणे काही राजकीय नेते, अधिकारी आणि आजी-माजी लोकप्रतिनिधींनी नियोजित शक्तीपीठ महामार्गात जाणाऱ्या संभाव्य जमिनी हेरून त्या विकत घेतल्याची चर्चा आहे. म्हणजे मंत्रालयात राहून हेच लोक मलई खातात, हे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com