Rahul Gandhi : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची देशात चर्चा सुरु आहे. या पार्श्वभुमीवर औरंगाबाद येथील रमेश पाटील या युवकाने काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांना केलेल्या फोनची ऑडिओ क्लिप आज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. राहुल गांधी यांच्या लग्नाचा विषय काढून, राहुल गांधी यांना भारत जोडो ऐवजी घर जोडो अभियान राबवण्याचा सल्ला फोनवरुन दिला. त्या युवकाच्या बोलण्याला दिलखुलास प्रतिसाद देत, बाळासाहेब थोरात यांनीही त्याच्याशी हसून संवाद साधल्याच्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाली आहे.
थोरात यांच्याशी बोलताना राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा भावल्याचे सांगत, त्याने यातून सर्वसामान्यांशी होत असलेल्या संवादाबाबत समाधान व्यक्त केले. त्यानंतर लगेचच थेट राहुल गांधी यांनी आतातरी लग्न केले पाहिजे. नाहीतर त्यांना वाढत्या वयात लग्नासाठी मुलगी मिळणार नाही अशी चिंताही व्यक्त केली.
भारत जोडो यात्रेतून देश जोडताना त्यांनी घर जोडो अभियान राबवून लग्न करण्याचा सल्ला दिल्याने थोरातांनाही हसू अनावर झाले. आपले हे मत त्यांनी राहुल गांधींपर्यंत पोचवण्याची अपेक्षाही त्याने व्यक्त केली. त्यांनी कोणत्याही समाजाची बायको करावी, त्यांनाही बायकोचा आणी दाल रोटीचा अनुभव आला पाहिजे. आपल्याला पक्षाशी काही घेणंदेणं नाही, परंतु किमान यावर्षी तरी राहुल गांधींचे लग्न होईल का ? असा सवालही त्याने बाळासाहेब थोरात यांना विचारला.
दोघांमध्ये झालेल्या सुमारे तीन मिनिटांच्या या संभाषणाची ऑडियो क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. औरंगाबादच्या त्या युवकाने व्यक्त केलेली चिंता व अपेक्षांची व त्याला न रागावता थोरातांनी दिलेल्या संयमी उत्तराची खुमासदार चर्चा संगमनेरात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.