Asphalt Price Hike : डांबर तापलं अन्‌ सोलापूर जिल्ह्यातील 600 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना ब्रेक लागला!

Iran-America war effect : इराण-अमेरिका युद्धाच्या परिणामामुळे डांबराचे दर दुप्पट झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोट्यवधी रुपयांच्या रस्ते कामांना ब्रेक लागला असून सुधारित दरांची मागणी आहे.
Asphalt Price Issue
Asphalt Price IssueSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 24 August (विठ्ठल सुतार) : इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम थेट रस्ते कामांवर झाला आहे. तीन महिन्यांपासून डांबराच्या दरात दुपटीने वाढ होत मार्च महिन्यात ४० हजार रुपये प्रतिटन मिळणारे डांबर आता ८० ते ८५ हजार रुपये प्रतिटन झाले आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषद, महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिलेल्या कामांवर झाला आहे. जिल्हा परिषदेचे १५ कोटी रुपये, महापालिकेकडील ३० कोटी, तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ८०० कोटी रुपयांच्या ६०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना ब्रेक लागला आहे. सरकारने डांबराचे सुधारित दर बदलून दिले, तरच ही कामे सुरू होतील, असे ठेकेदारांकडून सांगण्यात येत आहे.

मागील दोन वर्षांत निवडणुकांची आचारसंहिता वा इतर कारणांमुळे विकास कामांना ब्रेक लागला होता. तत्पूर्वी प्रशासकाच्या काळातही विकासकामांचा वेग संथच होता. आता विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्या आहेत, नवीन कारभारी सत्तेवर आले आहेत. पण, डांबराच्या दरात झालेल्या विक्रमी वाढीने रस्त्यांची कामे अडकली आहेत.

मागील आर्थिक वर्षात कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) दिलेले ३०० किलोमीटर लांबीचे रस्ते डांबराअभावी अपूर्ण अवस्थेत आहेत. अशीच स्थिती जिल्हा परिषद व महापालिकांकडील कामांची आहे. डांबराचे वाढीव दर दिले तर काम करू, अशी भूमिका कंत्राटदारांनी घेतली आहे. पण हा निर्णय सरकारी पातळीवरील असल्याने अधिकारीही हतबल आहेत. यामुळे जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत ही कामे किमान पुढील सहा महिने जैसे थे स्थितीत राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

रस्ते निविदा स्तरावरच

सोलापूर जिल्ह्यातील चारही विभागांकडून मार्च २०२६ मध्ये मंजूर केलेले प्रस्ताव सादर केले आहेत. यामध्ये अंदाजे ८०० कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. मागील महिनाभरात मंजूर केलेल्या जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या कामांची संख्याही ५०० च्या घरात आहे. नवीन अंदाजपत्रकानुसार डांबराच्या जुन्या दरात एक किलोमीटर रस्ता होत होता, आता नव्या दराने ७०० मीटरच होत असल्याने रस्त्यांची लांबीही कमी झाली आहे. पण, अद्याप हे रस्ते निविदा स्तरावरच आहेत.

Asphalt Price Issue
Shambhuraj Desai : सातारा जिल्हा बॅंकेबाबत भाजपचा स्वबळाचा नारा; ZPत धक्काबुक्की झालेल्या शंभूराज देसाईंची 'वेट अँड वॉच'ची भूमिका

डांबराचे नवीन दर दिले तरच कामे सुरू होतील : कंत्राटदार

सोलापूर महापालिकेने फेब्रुवारी महिन्यात मंजूर केलेली शहरातील कामे आजही अपूर्ण आहेत. डांबराचे दर दुपटीने वाढले आहेत. निविदा प्रक्रियेत डांबराचे जुने दर लावले आहेत. यामुळे महापालिका हद्दीतील अंदाजे ३० कोटी रुपयांची कार्यारंभादेश दिलेली कामे मागील तीन महिन्यांपासून रखडली आहेत. डांबराचे नवीन दर दिले तरच ही कामे पूर्ण होतील, असे कंत्राटदार दत्तात्रय मंठाळकर यांनी सांगितले.

Asphalt Price Issue
Satara Politic's : भाजप मंत्र्याच्या पत्नीची सातारा जिल्हा बॅंकेत एन्ट्री निश्चित; बॅंकेची सूत्रं कायम हाती राहणार!

दर वाढल्याने डांबराची मागणी घटली

इराण-अमेरिका युद्धामुळे डांबराच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मार्च महिन्यापर्यंत प्रतिटन ४० ते ४५ हजार (४० ते ४५ रुपये प्रतिकिलो) रुपयांपर्यंत मिळणारे डांबर ८५ हजारांवर (८५ रुपये प्रतिकिलो) पोहोचले आहे. यामुळे अनेक ठेकेदारांकडे कामे मंजूर असूनही ती बंद ठेवली आहेत. दर कधी कमी होतील, याबाबत ठोस सांगता येणार नाही. दर वाढल्याने डांबराची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे, असेही डांबर सप्लायर्स प्रशांत काळे पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com