Sahyadri Sugar Vote Counting : ‘सह्याद्री’च्या मतमोजणीत बाळासाहेब पाटलांच्या पॅनेलची आघाडी पोचली चार हजारांवर; पहिल्या फेरीत अण्णासाहेब पाटलांना सर्वाधिक मते

Balasaheb Patil's Panel's Lead : पहिल्या टप्प्यात एक ते पन्नास मतदान केंद्रांची मतमोजणी करण्यात आली आहे. त्यात माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पी. डी. पाटील पॅनलने आघाडी घेतली. सुमारे 4000 मतांनी त्यांच्या पॅनेलमधील सर्व उमेदवार आघाडीवर आहेत.
Sahyadri Sugar Vote Counting -Balasaheb Patil
Sahyadri Sugar Vote Counting -Balasaheb PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Karad, 06 April : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीत एक ते पन्नास मतदान केंद्रांची मतमोजणी दुपारी दोनच्या सुमारास पूर्ण झाली आहे. त्यात कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे पी. डी. पाटील पॅनेल सुमारे चार हजार मतांनी आघाडीवर राहिले आहे, त्यामुळे बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. कारण, एवढी मोठी आघाडी तोडणे अशक्य असल्याचे सांगितले जात आहे.

सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासाठी (Sahyadri Sugar Factory) माजी सहकार मंत्री तथा विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे आणि ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांचे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, काँग्रेसचे निवास थोरात, भाजपचे कार्यकारणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांच्या तीन पॅनेलमध्ये थेट लढत झाली होती.

सह्याद्री कारखान्याची निवडणूक तब्बल 25 वर्षांनंतर होत आहे. त्यात बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्यापुढे विरोधकांनी मोठी चुरस निर्माण केली होती. सह्याद्री कारखान्यासाठी शनिवारी सातारा, कराड, कोरेगाव, खटाव, कडेगाव या तालुक्यातील 99 केंद्रावर 81.7 टक्के मतदान झाले होते. कारखान्याच्या 32 हजार 205 सभासदांपैकी 26 हजार 109 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

Sahyadri Sugar Vote Counting -Balasaheb Patil
Sahyadri Sugar factory : सह्याद्री कारखान्याच्या मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात माजी मंत्री बाळासाहेब पाटलांचा पॅनेल एक ते दीड हजार मतांनी आघाडीवर

कऱ्हाडमधील वखार महामंडळाच्या गोदामात आज रविवारी (ता. ०६ एप्रिल) सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली हेाती. पहिल्या टप्प्यात एक ते पन्नास मतदान केंद्रांची मतमोजणी करण्यात आली आहे. त्यात माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पी. डी. पाटील पॅनलने आघाडी घेतली. सुमारे 4000 मतांनी त्यांच्या पॅनेलमधील सर्व उमेदवार आघाडीवर आहेत.

गट क्रमांक एक कराड : पहिल्या फेरीत टेबल क्रमांक एक ते पन्नास मतदान केंद्र क्रमांक एक ते पन्नास यामध्ये उमेदवारनिहाय पडलेली मते पुढील प्रमाणे

संजय किसन चव्हाण : 3848

राजेंद्र बाळासाहेब माने : 3786

अण्णासाहेब रामराव पाटील : 8114

संदीप यशवंत पाटील : 910

श्यामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील : 7854

Sahyadri Sugar Vote Counting -Balasaheb Patil
Nitin Gadkari : ‘मीही सुरुवातीला हीच चूक केली होती, तुम्ही बोध घ्या’; जातीनिहाय सेलबाबत बोलताना गडकरींचा भाजप नेत्यांना सल्ला

एकूण मतपत्रिका 13 हजार 230

वैध मतपत्रिका 13 हजार 64

अवैध मतपत्रिका 166

पहिल्या गटात 24 हजार 512 मते वैध ठरली आहेत.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

suresh dhas, prajkta dhas
Adinath Sugar Factory
 Sahyadri Sugar Factory Sabha
Harshvardhan Patil-Balasaheb Thorat
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com