Baramati Bypoll : बारामती पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट! सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार देणाऱ्या काँग्रेसमध्येच वाद

congress internal conflict Over baramati assembly bypoll : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक नवा ट्विस्ट आला असून सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार देणाऱ्या काँग्रेसमध्येच अंतर्गत वाद उफाळल्याचे दिसत आहे.
baramati assembly bypoll; ncp candidate sunetra pawar and harshwardhan sapkal
baramati assembly bypoll; ncp candidate sunetra pawar and harshwardhan sapkalsarkarnama
Published on
Updated on
Summary
  • बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आणि आकाश मोरे यांच्यात लढत

  • काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून अंतर्गत मतभेद उघड

  • काही नेते उमेदवारी मागे घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकत आहेत

Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक मैदानात उतरल्या आहेत.

सुरुवातीपासूनच बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. मात्र काँग्रेसने बारामती पोटनिवडणूक लढवण्याबाबत ठोस भूमिका घेत केंद्रीय नेत्यांची परवानगी देखील मिळवली.

त्यानंतर काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी देऊन त्यांचा उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. मात्र अर्ज दाखल करण्यापूर्वी राष्ट्रवादी आणि महायुतीतील अनेक नेत्यांनी काँग्रेसला अर्ज दाखल न करण्याची विनंती केली होती. मात्र काँग्रेसने ही विनंती धुडकावून लावत अर्ज दाखल केला होता.

baramati assembly bypoll; ncp candidate sunetra pawar and harshwardhan sapkal
Baramati bypoll update : काँग्रेसने उमेदवार द्यायला नको होता! प्रफुल्ल पटेलांचा बारामतीतून थेट प्रहार; पोटनिवडणुकीबाबत केला मोठा दावा

या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये अंतर्गत दोन गट पडले असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेते हे सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार न देण्याच्या भूमिकेत आहेत. हे नेते पक्षश्रेष्ठींकडे देखील उमेदवारी, मागे घेण्यासाठी जोर लावताना पाहायला मिळत आहेत.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दीर्घकाळ काँग्रेससोबत काम केलेला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देणे योग्य नसल्याचे एका गटाचे मत आहे. यामुळे वेगळा संदेश जाईल असं या गटाचे म्हणणं आहे. या गटामध्ये काही माजी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.

तर दुसरा गट निवडणूक लढण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून ही निवडणूक आपण महायुतीच्या विरोधात लढत असून ती कोणा एका व्यक्तीच्या विरोधात नाही. त्यामुळे निवडणूक लढली नाही तर देशामध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, असं म्हणत हा गट उमेदवारी अर्ज माग घेण्यास जोरदार विरोध करताना दिसत आहे. आता दोन्ही गटांनी आपापलं मत काँग्रेस हाय कमांडकडे पाठवलं आहे. आता हाय कमान त्यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

baramati assembly bypoll; ncp candidate sunetra pawar and harshwardhan sapkal
Baramati Bypoll : डाऊनफॉल सुरू! पार्थ पवारांचा काँग्रेसला सूचक इशारा

FAQs (Marathi)

1. बारामती पोटनिवडणूक का होत आहे?
मतदारसंघातील जागा रिक्त झाल्यामुळे पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे

2. राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार आहेत?
सुनेत्रा पवार या निवडणूक मैदानात उतरल्या आहेत

3. काँग्रेसने कोणाला उमेदवारी दिली आहे?
आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे

4. काँग्रेसमध्ये मतभेद का आहेत?
काही वरिष्ठ नेते उमेदवार न देण्याच्या भूमिकेत असल्यामुळे मतभेद निर्माण झाले आहेत

5. या निवडणुकीचे महत्त्व काय आहे?
ही निवडणूक महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकू शकते

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com