शिवसेनेला धोका देणे गडाखांच्या रक्तात नाही

मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) हे मणक्याच्या दुखण्यावर इलाज घेत आहेत.
Sunil Gadakh
Sunil GadakhSarkarnama
Published on
Updated on

सोनई ( जि. अहमदनगर ) - राज्यातील राजकारणात उलथा-पालथ सुरू आहे. शिवसेनेचे आमदार व खासदार मोठ्या संख्येत भाजपच्या बरोबर गेले आहेत. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) हे मणक्याच्या दुखण्यावर इलाज घेत आहेत. त्यांच्या भूमिकेबाबत काही जण प्रश्न उपस्थित करत आहेत. अहमदनगर जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख यांनी टीका करणाऱ्यांना चोख प्रतिउत्तर दिले आहे. ( Betraying Shiv Sena is not in Gadakh's blood )

खेडले परमानंद (ता.नेवासे) येथील नूतन ग्रामपंचायत कार्यालय व खुल्या व्यायाम शाळेच्या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर होते. खेडल्याचे सरपंच योगिता राजळे, उपसरपंच वंदना तुवर, जावेद इनामदार, ज्येष्ठ कार्यकर्ते सूर्यभान आघाव, माजी पंचायत समिती सदस्य दादासाहेब होन, सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. रमेश जाधव उपस्थित होते.

Sunil Gadakh
Video: शंकरराव गडाख मतदान केंद्रातून थेट रुग्णालयात

सुनील गडाख म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंत्री गडाखांवर विश्वास ठेवून तालुक्यास पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रीपद दिले. त्यांनी टाकलेल्या विश्वासास तडा देणे गडाखांच्या रक्तात नाही. अडचणीच्या काळात नेवासे तालुका पूर्ण ताकदीने शिवसेनेच्या पाठीशी राहणार, त्यांनी व्यक्त केला. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत निर्णयाला एकमुखी पाठिंबा दिला.

प्रास्ताविक भाषणात दगू हवालदार यांनी मंत्री गडाख यांच्या प्रयत्नातून गावाचा व परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असल्याचे सांगितले. गडाख यांनी तालुक्यातील सर्व विकास कामांना असलेली गती फक्त आणि फक्त मुख्यमंत्री ठाकरे यांनी टाकलेल्या विश्वासामुळेच आहे, असे सांगून काही अपेक्षा समोर ठेवून मन विचलित करणार नाही. कार्यकर्त्यांना विचारात घेवून यापूर्वी राजकीय बदलाचे निर्णय घेतले असल्याने मंत्री गडाख मुख्यमंत्री ठाकरे यांची साथ सोडणार नाहीत असे सांगितले.

Sunil Gadakh
मंत्री शंकरराव गडाखांच्या गावाला 'माझी वसुंधरा'अभियानाचे बक्षीस जाहीर

कार्यक्रमात 'भाजप' चे जिल्हा सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रम तांबे यांनी राहुरी तालुक्याची वाताहत पाहता नेवासे तालुक्यातील नेतृत्वाचे आम्हाला भूषण वाटते, असे सांगितले. उपस्थित कार्यकर्ते व शिवसैनिकांचे गडाख चालू राजकीय घडामोडींवर काय बोलणार याकडे लक्ष देवून होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.ई.डौले यांनी केले. जावेद इनामदार यांनी आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com