Dilip Walse Patil :‘कोण बनेगा करोडपती’च्या स्टाइलमध्ये वळसे-पाटलांची शेतकऱ्यांना ऑफर; उशिरा ऊस द्या, जादा भाव घ्या!

Bhimashankar Sugar Factory Offer : राज्यात कारखाने सुरू होणार असून अनेक कारखान्यांनी बॉयलर पेटवली आहेत. दरम्यान भीमाशंकर कारखान्याच्या बॉयलर प्रज्वलन व गव्हाण पूजन सोहळा दिलीपराव वळसे-पाटील यांनी केलेले वक्तव्य आता चर्चेत आले आहे.
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : राज्यात यावर्षी भीषण दुष्काळाची परिस्थिती असून, तापमानात वाढ होत असल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. यामुळे साखर कारखान्यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून, अनेक साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १०० दिवसांच्या आतच संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठवाड्यात तर दुष्काळी परिस्थितीमुळे कारखाने सुरू होतील की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. अशा या कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीतही आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर सहकार कारखान्याने योग्य नियोजन करून तब्बल १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

भीमाशंकर कारखान्याच्या २७ व्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रज्वलन व गव्हाण पूजन सोहळा राज्याचे माजी गृहमंत्री, सहकार मंत्री तथा कारखान्याचे संस्थापक दिलीपराव वळसे-पाटील आणि वारकरी संप्रदायातील संत, महंतांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात बोलताना वळसे-पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी एक आगळीवेगळी आणि आकर्षक ऑफर जाहीर केली.

Dilip Walse Patil
Dilip Walse Patil : उसाला 5 हजारांची उचल मागणाऱ्यांना वळसे पाटलांनी फटकारले : म्हणाले, ‘तुमच्या काकांनी ठेवलंय का?...कुठून देणार पाच हजार?

कशी आहे ‘केबीसी’ स्टाईल ऑफर?

यंदा दुष्काळामुळे ऊस उत्पादन घटण्याची शक्यता असून, गाळप हंगाम लवकरात लवकर संपण्याची दाट शक्यता आहे. हा हंगाम जास्त दिवस टिकावा आणि शेतकऱ्यांचेही हित जपले जावे, यासाठी भीमाशंकर कारखान्याने उसाच्या एफआरपी दरावर भरघोस वाढीव रक्कम देण्याची घोषणा केली आहे. सध्या उसाची एफआरपी ३ हजार २७३ रुपये इतकी आहे. यावर शेतकऱ्यांना उसाच्या टप्प्यानुसार वाढीव दर मिळणार आहेत.

जानेवारीमध्ये ऊस गाळपासाठी देणाऱ्या शेतकऱ्यांना एफआरपीच्या रकमेवर १०० रुपये अधिक मिळणार आहेत. फेब्रुवारीमध्ये ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना २०० रुपये जादा दिले जातील. मार्च महिन्यात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट ३०० रुपये जादा मिळणार आहेत.

या अनोख्या घोषणेमुळे “जितका उशिरा ऊस द्याल, तितका जादा भाव मिळवाल,” अशी ‘कोण बनेगा करोडपती’ स्टाईलची ही ऑफर सध्या पंचक्रोशीत आणि शेतकरी वर्गात चर्चेचा मोठा विषय ठरत आहे.

Dilip Walse Patil
Dilip Walse Patil : पवारांनी फडणवीसांना पत्र लिहिलं अन् वळसे पाटलांवरील आरोपांना मिळाली धार ; ‘मास्टरमाईंड, आका’ म्हणणाऱ्यांना 100 कोटींचा इशारा!

या पद्धतीमुळे केवळ कारखान्याचे गाळप दिवस वाढण्यास मदत होणार नाही, तर प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातील उसाची योग्य रिकव्हरी काढून त्यानुसार अचूक भाव देणे शक्य होईल, असा विश्वासही दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com