Anil Sole News : भाजपने विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामध्ये नागपूर पदवीधरमधून सुधाकर कोहळेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. येथून भाजप नेते, माजी महापौर अनिल सोले हे देखील इच्छुक होते. भाजपने आपली उमेदवारी यादी जाहीर करताच सोले यांनी बंडाचे निशाण फडकावले.
अनिल सोले यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांचे आणि सुधाकर कोहळेंचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर होते. मागील निवडणुकीत देखील सोले इच्छुक होते. त्यावेळी संदीप जोशी यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र, काँग्रेस उमेदवाराने त्यांचा पराभव केला होता.
त्यामुळे या वेळी सोले यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. मात्र, पक्षाने सुधाकर कोहळेंवर विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केले. त्यानंतर सोले यांनी आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर करत अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.
ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सोशल मीडियावर आवाहन करत त्यांनी म्हटले आहे की, आपल्या सर्वांचे प्रेम, कार्यकर्त्यांचा आग्रह आणि पदवीधर मतदारांच्या विश्वासाच्या जोरावर, मी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ साठी माझा उमेदवारी अर्ज उद्या दाखल करत आहे.या महत्त्वपूर्ण प्रसंगी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मला आशीर्वाद व पाठिंबा द्यावा ही विनंती.
सोले यांना उमेदवारी मिळेल, असा विश्वास होता. मागील वेळी आपल्यावर अन्याय झाला अशी त्यांची भावना होती. दरम्यान, निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या निर्णयाबाबत त्यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने आपण निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.