Victory Jallosh : भाजप उमेदवाराने निकालाआधीच उधळला विजयाचा गुलाल

Karad Panchayat Samiti Election 2026 : सातारा जिल्हा परिषद व कऱ्हाड पंचायत समिती मतदानानंतर भाजप उमेदवाराने निकालाआधीच विजयाचा गुलाल उधळल्याने तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
BJP Candidate Victory Jallosh
BJP Candidate Victory Jallosh Sarkarnama
Published on
Updated on

Karad, 08 February : सातारा जिल्हा परिषदेचे गट आणि कऱ्हाड पंचायत समिती गणासाठी शनिवारी (ता. 08 फेब्रुवारी) चुरशीने मतदान झाले. मतदानानंतर कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोचलेली असतानाच कऱ्हाड पंचायत समिती गणातील भाजप उमेदवाराने निकालाआधीच विजयाचा गुलाल उधळला. त्याची मोठी चर्चा तालुक्यातील राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) तालुक्यातील वाघेरी पंचायत समिती गणातील भाजपच्या उमेदवार (BJP Candidate) हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्या वहिनी अनिता सतीश वेताळ यांच्या समर्थकांनी मतदानानंतर निकाल लागण्याची वाट न पाहताच विजयाचा गुलाल उधळला. अनिता वेताळ निवडून येणार असल्याचा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठा कॉन्फीडन्स असल्याने त्यांनी निकालाआधीच गुलाल उधळून जल्लोष केला आहे.

कराड (Karad) तालुक्यात जिल्हा परिषदेच्या कोपर्डे हवेली गटातून स्वाती चव्हाण (भाजप), स्वाती पवार (राष्ट्रवादी-तुतारी), विद्या वेताळ (अपक्ष-कपबशी) या निवडणुक लढवत आहेत. वाघेरी गणातून संगीता पिसाळ (राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी), अनिता वेताळ (भाजप), नीलम पिसाळ (अपक्ष-नारळ) या आणि कोपर्डे हवेली गणातून सिद्धार्थ चव्हाण (राष्ट्रवादी - तुतारी), दत्तात्रेय शेलार (भाजप), प्रमोद जगदाळे (स्वाभिमानी पक्ष- शिट्टी), अमित पाटील (अपक्ष- नारळ) हे निवडणूक लढवत होते.

BJP Candidate Victory Jallosh
Mohite Patil Voting : मोहिते पाटलांवर कारवाई होणार; मुलाला मतदान केंद्रात नेणे भोवणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

सातारा जिल्हा परिषद आणि कराड पंचायत समितीसाठी शनिवारी सकाळी साडेसात ते सांयकाळी साडेपाचपर्यंत मतदान झाले. मतदान सायंकाळी साडेपाच वाजता पार पडल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास भाजपच्या समर्थकांनी हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्या वहिनी अनिता वेताळ यांच्या समर्थनार्थ समर्थकांनी विजयाचा गुलाल उधळला.

BJP Candidate Victory Jallosh
CM Siddaramaiah : हेलिपॅडवर जय्यत तयारी, पण हवेतच गायब झाले सिध्दरामय्यांचे हेलिकॉप्टर अन् काळजाचा ठोका चुकला...

अनिता वेताळ ह्या वाघेरी गणातून निवडून येणार असल्याचा भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कॉन्फीडन्स असल्याने त्यांनी निकालाआधीच विजयाचा गुलाल उधळून जल्लोष केला. त्याचीच सध्या चर्चा सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com