(Video) Praniti Shinde Vs Chandrakant Patil : ‘प्रणितीताई, चंद्रकांतदादांचा तो उल्लेख करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही’

Ram Kulkarni Reply to Praniti Shinde : तुम्हाला खासदार होऊन चार दिवसही झाले नाहीत, तोच तुम्हाला एवढी खासदारपदाची मस्ती चढली आहे का?
Ram Kulkarni-Praniti Shinde
Ram Kulkarni-Praniti ShindeSarkarnama

Solapur, 21 June : दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावभेट दौऱ्यादरम्यान कंदलगाव येथे बोलताना काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख ‘चंपा’ असा केला होता. त्याचा भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांची तुमच्या पित्यासमान वयाच्या चंद्रकांत पाटील यांचा ऐकेरी उल्लेख करताना ‘प्रणितीताई, तुम्हाला लाज कशी वाटली नाही,’ असा संतप्त सवाल केला.

नेहमीच संस्काराची भाषा बोलणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti shinde) यांनी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा उल्लेख ज्या शब्दांत आणि भावविवेश पद्धतीने केला. यावरून मला त्यांना सांगायचं आहे की ज्यांचा उल्लेख तुम्ही केला, ते तुमच्या वडिलांच्या वयाचे आहेत. तुम्हालाही वडिलांसमान आहेत, असा टोला भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी लगावला.

ते म्हणाले, काय बोलण्याची संस्कृती आहे की नाही. तुम्ही नवीन खासदार आहात. तुम्ही सोलापूरकरांना हे संस्कार दाखवणार आहात का. तुम्हाला ही कशीची मस्ती आली आहे. तुम्ही संसदेत अजून खासदारपदाची शपथसुद्धा घेतलेली नाही आणि तुम्ही चंद्रकांत पाटील यांचा ऐकेरी भाषेत उल्लेख करता.

आपण खासदार जरी झालो तरी जनता बघत असते. आपलं वर्तन कसं आहे, आपण काय करत असतो. प्रणितीताई, चंद्रकांत पाटील यांचा ऐकेरी उल्लेख करायला तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती. एवढी टावळखोरी जर तुमच्या अंगात आली असेल तर तुम्हाला सोलापूरची जनता कधीच माफ करणार नाही, असा इशाराही राम कुलकुर्णी यांनी प्रणिती शिंदे यांना दिला.

Ram Kulkarni-Praniti Shinde
Shivsena Bhavan Attack : प्रणिती शिंदेंच्या सांगण्यावरूनच शिवसेना कार्यालयावर हल्ला; मनीष काळजेंचा आरोप

तुम्हाला खासदार होऊन चार दिवसही झाले नाहीत, तोच तुम्हाला एवढी खासदारपदाची मस्ती चढली आहे का? आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी कसा वागतो? याकडे समाजाचे लक्ष असते. तुमच्या मस्तीला सोलापूरची जनता कधीच माफ करणार नाही, लक्षात घ्या, असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

Ram Kulkarni-Praniti Shinde
Solapur Politics : शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या कार्यालयात गाडी घुसवली; काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com