Maharashtra Politics : भाजपने भाकरी फिरवली! विद्यमान खासदारांना सांगलीला धाडलं; नुकताच प्रवेश केलेल्या नेत्याला दिली करवीरची जबाबदारी

BJP Prithviraj Patil Dhananjay Mahadik Politics : विधानसभा निवडणुकीनंतर कोल्हापुरात भाजपला अच्छे दिवस आले. मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत याला ब्रेक लागला. यानंतर आता पक्षाने नव्या नियुक्त्या करत भाकरी फिरवली आहे.
Maharashtra BJP Politics; Prithviraj Patil Dhananjay Mahadik Politics
Maharashtra BJP Politics; Prithviraj Patil Dhananjay Mahadik Politicssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. भाजपने महाराष्ट्रातील जिल्हा प्रभारींची नवी यादी जाहीर केली आहे.

  2. गोपीचंद पडळकर, पृथ्वीराज पाटील आणि धनंजय महाडिक यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

  3. कोल्हापूर आणि सांगलीत आगामी राजकीय लढतीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे.

Sangli Kolhapur Politics : विधानसभा निवडणुकीनंतर कोल्हापुरात भाजपला अच्छे दिवस आले आहेत. चंदगड पाठोपाठ भुदरगड, राधानगरीमध्ये कार्यकर्त्यांचे जाळे विस्तीर्ण होत आहे. तर शिरोळ, शाहूवाडी, इचलकरंजीमध्ये भाजपचे संघटन मजबूत होत चालले आहे. मात्र करवीर सारख्या भागात भाजपच्या संघटनाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ब्रेक लागला. करवीरमध्ये संघटनेचे अस्तित्व कमी झाल्यानंतर या ठिकाणी पक्ष संघटन करण्यासाठी नव्या नियुक्त्या भाजपकडून करण्यात आल्या आहेत.

करवीरची जबाबदारी सांगलीच्या पृथ्वीराज पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. यामुळे त्यांच्यासमोर करवीरमध्ये प्राबल्य असणाऱ्या काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते राहुल पाटील, शिवसेनेचे आमदार असलेले चंद्रदीप नरके यांचे आव्हानात्मक असणार आहे.

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा प्रभारींची यादी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये सांगली जिल्ह्यातील तीन नेत्यांची वर्णी लागली आहे. तर कोल्हापूरातील नेत्यांची वर्णी लागली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे 'सोलापूर पूर्व', शेखर इनामदार यांच्याकडे पुणे तर अवघ्या सात-आठ महिन्यांपूर्वी भाजपमध्ये आलेले पृथ्वीराज पाटील यांच्याकडे 'कोल्हापूर पश्चिम' अर्थात करवीरची जबाबदारी देण्यात आली आहे.

Maharashtra BJP Politics; Prithviraj Patil Dhananjay Mahadik Politics
Maharashtra Politics : काँग्रेसमध्ये मोठी चुरस! पुणे शहरासाठी तब्बल २० जण इच्छुक, ग्रामीण भागातही १५ जणांची रेस

पक्षाचे संघटन वाढवणे, सक्षम करणे आणि गतिशील करणे, या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाने आज राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा प्रभारींची नावे जाहीर केली. भाजपचे कोल्हापूरमधील खासदार धनंजय महाडिक यांची सांगली शहर-जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे येथील वर्षा डहाळे यांची सांगली ग्रामीण जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान सात ते आठ महिन्यापूर्वी भाजपमध्ये आलेले पृथ्वीराज पाटील यांना महत्त्वाच्या पदावर संधी दिल्याने पाटील यांचे भाजपमधील स्थान अधोरेखित झाले आहे.

Maharashtra BJP Politics; Prithviraj Patil Dhananjay Mahadik Politics
Dhananjay Mahadik : मुन्ना - बंटी वाद पेटणार! साम, दाम दंड भेद वापरा, धनंजय महाडिकांनी थेट टार्गेटवर घेतले...

FAQs :

1. भाजपने काय घोषणा केली आहे?
जिल्हा प्रभारींची नवी यादी जाहीर केली आहे.

2. कोणत्या नेत्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या?
गोपीचंद पडळकर, पृथ्वीराज पाटील आणि धनंजय महाडिक यांना प्रमुख जबाबदाऱ्या देण्यात आल्या.

3. कोल्हापूरमध्ये कोणाला जबाबदारी मिळाली?
पृथ्वीराज पाटील यांना कोल्हापूर पश्चिमची जबाबदारी देण्यात आली.

4. सांगलीत कोणाची नियुक्ती झाली?
धनंजय महाडिक यांची सांगली शहर-जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती झाली.

5. या बदलाचा अर्थ काय आहे?
आगामी निवडणुकांसाठी भाजपची संघटनात्मक तयारी मजबूत होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com