Kargani Deputy Sarpanch : मोठा भाऊ उपसरपंच झाला अन्‌ राम मंदिराला हेलिकॉप्टरमधून प्रदक्षिणा घालून ‘ती’ शपथ पूर्ण केली...

Gram Panchayat Election : सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील करगणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी साहेबराव खिलारे यांची निवड झाली.
Kargani Deputy Sarpanch News
Kargani Deputy Sarpanch NewsSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : मोठा भाऊ उपसरपंच झाला आणि वीस वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण झाले. भाऊ उपसरपंच झाल्याच्या आनंदातून गावातील राम मंदिराला आणि संपूर्ण गावाला हेलिकॉप्टरमधून प्रदक्षिणा घालण्याची घेतलेली सुमारे २० वर्षांपूर्वीची शपथही पूर्ण केली. हे बंधूप्रेम सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील करगणी या गावात पाहायला मिळाले. (Brother became Deputy Sarpanch and circumambulated Ram Mandir in helicopter)

आटपाडी तालुक्यातील करगणी ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच झाली. त्या निवडणुकीत अंकुश खिलारे यांचे मोठे बंधू साहेबराव खिलारे हे निवडून आले. निवडणुकीनंतर उपसरपंचपदीही साहेबराव खिलारे यांची निवड झाली. त्यामुळे मोठ्या भावाच्या यशाचे सेलिब्रेशन अंकुश खिलारे यांनी अनोख्या पद्धतीने केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kargani Deputy Sarpanch News
Karad Political News : माजी सहकारमंत्र्यांना रोखण्यासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षांची खेळी

अंकुश खिलारे यांचे चुलते दुर्योधन खिलारे हे करगणी गावच्या राजकारणात होते. त्यांची सरपंच होण्याची संधी अगदी थोडक्यात हुकली होती. त्याचवेळी अंकुश खिलारे यांनी शपथ घेतली होती. वडील, भाऊ गावचे सरपंच अथवा उपसरपंच झाले तर गावाला आणि गावातील राम मंदिराला हेलिकॉप्टरमधून प्रदक्षिणा घालेन.

अंकुश खिलारे यांची ती इच्छा वीस वर्षांनंतर पूर्ण झाली आहे. मोठा भाऊ उपसरपंच झाल्याचा मोठा आनंद साहेबराव खिलारे यांच्या तीन भावांना झाला, त्यामुळे त्यांनी हेलिकॉप्टरमधून गावाला आणि गावातील राम मंदिराला तीन ते चार वेळा प्रदक्षिणा घातली.

याबाबत उपसरपंच साहेबराव खिलारे यांचे धाकटे बंधू अंकुश खिलारे म्हणाले की, करगणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माझ्या भावाचा दणदणीत मतांनी विजय झाला. त्यानंतर ते उपसरपंचही झाले आहेत. माझे आणि माझ्या वडिलांचे जे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर रामाच्या मंदिराला हेलिकॉप्टरमधून प्रदक्षिणा घालेन. तसेच, करगणी गावालाही प्रदक्षिणा घालीन, अशी शपथ मी घेतली हाेती ती पूर्ण केली आहे.

Kargani Deputy Sarpanch News
Bidri Sugar Factory Elections : मतदानाआधीच मुश्रीफांनी ‘बिद्री’चा निकाल जाहीर करून टाकला; आजऱ्याचंही गुपित उलगडलं

करगणी ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच झाली. त्या निवडणुकीत अंकुश खिलारे यांचे मोठे बंधू साहेबराव खिलारे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. विशेष म्हणजे ते पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीत उतरले होते. त्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांच्या गळ्यात उपसरपंचपदाची माळ पडली, असे अंकुश खिलारे यांचे मित्र दत्तात्रेय खिलारे यांनी सांगितले.

Kargani Deputy Sarpanch News
Ajit Pawar Group Leader Statement : ‘लोकसभेची काळजी तुम्ही करू नका; भावाला बहिणीची काळजी आहे...’

अंकुश खिलारे यांचे चुलते दुर्योधन खिलारे हे वीस वर्षांपूर्वी गावच्या राजकारणात होते. काही कारणांमुळे त्यांना सरपंचपद मिळाले नव्हते. त्याचवेळी अंकुश खिलारे यांनी शपथ घेतली हाेती. ज्यावेळी माझा भाऊ, वडील अथवा जवळची व्यक्ती सरपंच अथवा उपसरपंच झाली, तर करगणी गावाला आणि रामाच्या मंदिराला हेलिकॉप्टरमधून प्रदक्षिणा घालेन. ती शपथ त्यांनी पूर्ण करून दाखवली आहे, असेही दत्तात्रेय खिलारे यांनी नमूद केले.

Kargani Deputy Sarpanch News
Solapur NCP : अजित पवारांंनी दिला एकनिष्ठ शिलेदाराला न्याय; दहा वर्षांची प्रतीक्षा संपली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com