Shivsena Corporator : 8 लाख दिल्याशिवाय बुलेट, मारुती गाडी देणार नाही; शिवसेना नगरसेवकाची अवैध सावकारी, गुन्हा दाखल

Shiv Sena corporator illegal money lending case: मोहोळ पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या नगरसेवकाविरोधात अवैध सावकारीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Shiv Sena Corporator Faces FIR Over Illegal Money Lending in Mohol
Shiv Sena Corporator Faces FIR Over Illegal Money Lending in MoholSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 25 June : अवैध सावकारी प्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवकाविरोधात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तुमच्याकडे आठ लाख रुपये होतात, ते दिल्याशिवाय बुलेट आणि मारुती गाडी देणार नाही, अशी धमकी संबंधित नगरसेवकाने दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मोहोळ नगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक लखन कोळी अशी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकावर खासगी सावकारीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने मोहोळ शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सहायक निबंधक सहकारी संस्था आणि मोहोळ पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथील अण्णासाहेब विष्णू शेटे, विशाल आण्णासाहेब शेटे आणि सुवर्णा शेटे यांनी शिवसेनेचे नगरसेवक लखन कोळी याच्याविरोधात तक्रार दिली होती.

शेटे यांच्या पोलिस तक्रारीनुसार नगरसेवक लखन कोळी याच्याकडून शेटे कुटुंबीयांनी 4 लाख रुपये व्याजाने घेतले होते. शेटे यांनी घेतलेली सर्व रक्कम परत केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आलेला आहे. मात्र, नगरसेवक कोळी याने शेटे कुटुंबाला धमकविल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Shiv Sena Corporator Faces FIR Over Illegal Money Lending in Mohol
Devendra Fadnavis : नाशिकच्या घटनेनं डोळे उघडले, CM फडणवीस आता महिला आमदारांची टीम उतरवणार मैदानात

15 टक्के व्याजाप्रमाणे तुमच्याकडे 8 लाख रुपये शिल्लक राहतात, ते दिल्याशिवाय तुमची बुलेट आणि मारुती मोटार परत देणार नाही, अशी धमकी दिल्याचे शेटे कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले आहे. शेटे यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती.

लखन कोळी याच्याविरोधात आलेल्या तक्रारीची शहानिशा करून त्यांचे जाबजबाव घेण्यात आले. त्यानंतर ता. 23 जून रोजी जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, मोहोळचे सहायक निबंधक सुमित कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख एस. टी. शिंदे, के. बी. जमादार, डी. एस. साळुंके, संदीप शेंद्रे यांचे पथक नगरसेवक लखन कोळी याच्या घरी गेले.

Shiv Sena Corporator Faces FIR Over Illegal Money Lending in Mohol
Kolhapur politics : 'गोकुळ'वरून कोल्हापुरात ठिणगी! मुश्रीफांच्या मेळाव्याच्या प्रवेशद्वारावरच सतेज पाटलांची बॅनरबाजी

पथकाने लखन कोळी याच्या घराची झाडाझडती घेऊन तपासणी करण्यात आली. त्या वेळी कोळी याच्या घरात अनेक व्यक्तींचे सह्या असलेले कोरे धनादेश, तसेच १०० रुपयांचे काही स्टॅम्प आढळून आले आहेत, त्यामुळे नगरसेवक कोळी याच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने मोहोळ शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com