Chandrakanat Patil Sangli ZP
Chandrakanat Patil Sangli ZPSarkarnama

Chandrakant Patil Sangli : सांगलीत जिल्हा परिषदेसाठी चंद्रकांत पाटलांची 'फिल्डिंग', विरोधकांचे धाबे दणाणले? नेमकं काय आहे समीकरण?

Chandrakant Patil Sangli political strategy : सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांनी राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत. नेमकं काय आहे नवं समीकरण? विरोधकांमध्ये का वाढली चिंता? वाचा सविस्तर बातमी.
Published on

सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. केवळ एक जागेवरून महाविकास आघाडी बहुमतापासून दूर आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघे एकत्र येऊन सांगली जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याच्या चर्चा सुरू असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत येऊन सूत्रे फिरवली आहेत.

सांगली जिल्हा परिषदेवर महायुतीचा अध्यक्ष करण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेटीगाठी घेऊन फिल्डिंग लावली आहे. सध्या महायुतीकडे मॅजिक फिगरचे संख्याबळ. त्यामुळे भाजपला अध्यक्षपद येत नसले तरी महायुतीच्याच घटक पक्षाचा अध्यक्ष होईल असे मंत्री पाटील म्हटले आहे.

Chandrakanat Patil Sangli ZP
Nirmala Nawale Video : धक्कादायक! पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांना चक्क ड्रग्ज दिलं; राष्ट्रवादीच्या निर्मला नवलेंचा खळबळजनक आरोप!

सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 18, भाजपचे 16, काँग्रेस 11, राष्ट्रवादी (अजित पवार) 6, शिंदेसेना 7, रयत क्रांती व जनसुराज्य प्रत्येकी 1, असे संख्याबळ आहे. महायुतीकडे एकूण 31 तर, राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस व उद्धवसेनेचे मिळून ३० सदस्य आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी पक्षीय नेत्यांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या चर्चा सुरू असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत जिल्हा परिषदेवर सत्ता असताना साठी प्रयत्न सुरू ठेवला आहे.

कोणत्याही परिस्थितीत महायुतीची सत्ता आणण्यासाठी भाजप एक पाऊल मागे येण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजपने घेतला असल्या तरी सुरुवातीच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद जाण्याची शक्यता आहे. तर महायुतीचे संख्याबळ आणखी कसे वाढेल याच्या प्रयत्नात चंद्रकांत पाटील आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील आणखीन कोण गळायला लागेल का याचा प्रयत्न सुरू राहण्याची शक्यता आहे.

Chandrakanat Patil Sangli ZP
8th Pay Commission : होळी-दिवाळी आता एकत्रच! 8 व्या वेतन आयोगामुळे एका झटक्यात कर्मचाऱ्यांना मिळणार 9 लाख?

दादांची मिश्किल टिप्पणी आणि अंदाज आला

राजकारणात अंकापेक्षा समन्वय महत्त्वाचा असतो. २०२२ मध्ये भाजपकडे १२२ आमदार असताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले होते. युतीतील कुठल्या पक्षाची अध्यक्षपदाची अट नाही. आम्ही समन्वय ठेवून निर्णय घेऊ. असे पत्ते ओपन केले तर मी नेता कसला? अशी मिश्किल टिप्पणीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com