मोठी बातमी: चंद्रकांत पाटील, मुश्रीफांची लढण्याची तयारी; तर शौमिका महाडिकांचा बिनविरोधचा 'मास्टरस्ट्रोक'?

Shaumika Mahadik masterstroke latest news : चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या लढण्याच्या तयारीची चर्चा, तर शौमिका महाडिकांच्या बिनविरोधच्या रणनीतीने कोल्हापूरच्या राजकारणात चर्चेला उधाण.
Gokul Dairy Election
Gokul Dairy ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमध्ये सुरू असलेला अंतर्गत संघर्षावर पडदा टाकण्यासाठी गुरुवारी हॉटेल पॅवेलियन येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

या बैठकीत वरिष्ठ नेत्यांकडून ही निवडणूक बिनविरोध होणार नाही असा ठामपणे दावा केला जात असताना अजूनही गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक यांच्याकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Gokul Dairy Election
Abhijeet Dipke on Protest : ज्ञानेश कुमारांच्या विरोधात CJP आक्रमक, आंदोलनाची तारीख अन् जागा जाहीर, दीपके म्हणतात - 'उद्यापर्यंत...'

गुरुवारी चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. महायुती संदर्भात सर्व चर्चा सकारात्मक झाली आहे. जागावाटप अद्याप झाली, पण निवडणूक लढवण्याची आमची तयारी आहे. गोकुळ निवडणुकीत राजकीय संघर्ष कमी होईल. असा विश्वास शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला.

सध्या सतेज पाटील एकटेच प्रचारात आहेत. त्यावर बोलताना, महाडिक यांनी ते सुद्धा एका पक्षाचे नेतृत्व करतात, त्यामुळे सध्याची परिस्थितीत ते सभासदांसमोर मांडत आहेत. या ठिकाणी आम्ही असतो तर हेच केले असतें. पण सहकारच्या निवडणुका वेगळ्या असतात, या जनरल निवडणुका नाहीत. त्यामुळे याचा जास्त परिणाम होणार नाही. असेही महाडिक म्हणाल्या.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांनी पाठिंबा द्यावा, यां वक्ताव्यावर पाठिंबा घेण्यापेक्षा त्यांनी सोबत आले तर सर्वात जास्त आनंद आहे. असं महाडिक यांनी स्पष्ट करत कोणाच्या हाथी गोकुळ गेला तर सभासद हिताचा निर्णय व्हावा. जे निर्णय चुकीचे झाले त्याचा मी विरोध, यापूढे मी करत राहीन. जे हिताचे निर्णय झाले त्यांचे मी स्वागत केले आहे.

Gokul Dairy Election
Maharashtra drought : राज्यात दोन टप्प्यांत दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता : पहिल्या टप्प्यातील 139 पात्र तालुक्यांची यादीच समोर

मंत्री मुश्रीफ यांची बिनविरोध निवडणूक नं करण्याची आहे हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. पण निवडणूक बिनविरोध व्हावी हे माझं व्यक्तिगत मत, असल्याचे महाडिक म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com