

Pune News : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर अवमानकारक मजकूर आणि अश्लील भाषेत चित्रफीत (व्हिडिओ) प्रसारित केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुनील पांडे (वय ५६, रा. भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना) यांनी यासंदर्भात डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी ‘राजकारण एक्सप्रेस’ या सोशल मीडिया हँडलवरून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी एक व्हिडिओ प्रसारित केला होता. या व्हिडिओमध्ये "जनतेच्या प्रश्नांची उत्तरे नेते देत नाहीत, पाटील हे त्यापैकीच एक आहेत," अशा मजकुरासह अत्यंत शिवराळ आणि अश्लील भाषेचा वापर करण्यात आला होता.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या अवमानकारक वक्तव्याची दखल घेत नगरसेवक सुनील पांडे यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे.
पांडे यांच्या फिर्यादीवरून डेक्कन पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत. सोशल मीडियावर नेत्यांविषयी होणाऱ्या आक्षेपार्ह टिप्पणीवर पोलिसांकडून काय कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.