Chandrakant Patil: ठाकरेंना मी शिकवणार नाही... शिकवणारा त्यांच्या शेजारी बसतो : चंद्रकांतदादांचा संजय राऊतांना टोला

Chandrakant Patil, Uddhav Thackeray, Sanjay Raut: चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला. खासदार फुटीवरून भाजपला दोष देणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.
Chandrakant Patil-Sanjay Raut
Chandrakant Patil-Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Chandrakant Patil: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शुक्रवारी (१९ जून) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी २० जून रोजी होणाऱ्या पोलीस ग्राउंड येथील सभास्थळाची पाहणी करण्यासाठी आज उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दाखल झाले होते. यावेळी बोलताना ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्यावर चांगलेच बरसले.

ठाकरेंचे सहा खासदार फुटले यावर भाजपला संजय राऊत दोष देत आहेत. पण कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. आम्हाला फटका बसायचं असेल तर तो कर्माने बसेल. त्यात तुम्ही कशाला भविष्यवाणी करायला हवी. गरजेल तो पडेल काय? तुम्हीच म्हणता फुटणार नाही, फुटणार नाही आणि फुटले की तुडवा-तुडवा म्हणायचं. त्यामुळे जी ऑपरेशन कराल ते शांततेत करा टिकवण्याचेही आणि काढण्याचे, असा टोला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

Chandrakant Patil-Sanjay Raut
Maharashtra Political Live Updates : जीएसटी विभागाची गंगापूर येथील एका व्यापाऱ्यावर मोठी कारवाई, स्थावर मालमत्ता जप्त

केंद्रीय मंत्री अमित शाह दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्याची पूर्वतयारी झाली आहे. इचलकरंजी आणि कोल्हापूर मध्ये चांगली तयारी झाली आहे. लोकांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आग्रहाखातर राज्य सरकारने तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला सुमारे पंधराशे कोटींचा निधी दिला. यातील ९०० कोटी रुपये जमीन अधिग्रहणासाठी जातील. उर्वरित निधीतून विकासकामे केली जाणार आहेत. अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

गेली तीन-चार महिने आमचा आग्रह होता. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पायाभरणीसाठी यावं मात्र आचारसंहिता लागली. विधानसभा त्यानंतर नगरपरिषद आणि आता नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेची आचारसंहिता सुरू होती. मंत्री शाह अंबाबाईचे भक्त असल्यामुळे केंद्राच्या प्रसाद योजनेतून अंबाबाई मंदिरासाठी यातून निधी मिळेल. इचलकरंजीतील बँकेला आणि हुपरीतील साखर कारखान्याला कल्लाप्पाआण्णा आवाडे यांचं नाव देण्यात येणार आहे, त्याच्या उद्घाटनासाठीही मंत्री शाह उपस्थित राहणार आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या परिस्थितीवर बोलताना, "माजी मुख्यमंत्री उद्धवजींना सांगण्याइतका मी मोठा नाही. मला असं वाटतं की तोच मोठा होतो जो वस्तुस्थिती आणि भविष्याचा अंदाज घेतो. छत्रपती शिवरायांचा आदर्श आपण घेतो. छत्रपती शिवरायांनी कुठे थांबायचं, कुठे पुढे जायचं कुठे मागायचं ठरवलं होतं. त्यामुळे माणसाच्या आयुष्यातही कुठे थांबायचं कुठे पुढे जायचं हे समजायला हवं. आत्मपरीक्षण करायला कोणीही लागत नाही, मनाची तयारी लागते ती उद्धवजींची असेल त्याला मग कोणीही लागत नाही. त्यामुळे तिकडे वातावरण असं आहे. पराचा कावळा होईल, मी म्हणतो आत्मपरीक्षण मात्र तिकडे मलाच हा काय शिकवायला असा संदेश जाईल. त्यांना शिकवायला त्यांचा शेजारी असतो." असा टोला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला.

Chandrakant Patil-Sanjay Raut
Maharashtra Politics Live Update : मोहोळचे आमदार राजू खरे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना पाठिंबा

"महाविकास आघाडीतील 'महा' आता काढायलाच पाहिजे, आघाडी पुरेशी झाली आता काय राहिलं. महा विकास तर राहिलाच नाही. महाविकास आघाडीला सध्या काही कार्यक्रमचं नाही, रोहित पवारांना रोज एक विषय लागतो. उपोषणाला बसतात काय, उपोषण सोडतात काय, उठले काय आणि बसले काय? विरोधी पक्ष सैरभैर झाला आहे, मी संसदीय कार्यमंत्री त्यामुळे सभागृह चालवायला मला इतकं सोपं जातं. यांना झोपेत सुद्धा बीजेपी आणि महायुती आणि आम्ही दिसतच असू, त्यातच तुम्ही अशा बातम्या सोडता, त्यामुळे ते घाबरतात." असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com