सत्ता गेल्यावर लोक भ्रमिष्ट होतात : सोन्याच्या मुकुटाच्या ऑफरवर जयंतरावांचा चंद्रकांतदादांना टोला

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोशात केलेली ऑफर फसवी आहे.
Jayant Patil_chandrakant Patil
Jayant Patil_chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

सांगली : सोन्याचा मुकुट द्यायचाच नसल्याने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोशात केलेली ऑफर फसवी आहे. सत्ता गेली की लोक भ्रमिष्ट होतात किंवा त्यांचा तोल जातो. आता भाजपच्या अनेक नेत्यांचे नेमके काय झाले आहे, हा संशोधनाचा विषय आहे, अशा शब्दांत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेचे प्रहार केले. (Chandrakantdada's offer of gold's crown fraudulent: Jayant Patil)

सांगली पोलिस मुख्यालयाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने ते जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी सांगली दौऱ्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जयंत पाटील यांचा नामोल्लेख टाळत त्यांना असा एकदा जोराचा शॉक द्या. त्याबद्दल सोन्याचा मुकुट घालून तुमचा सत्कार करू, असे नवे लक्ष्य दिले होते. त्याचवेळी त्यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करीत टीका केली होती. जयंतरावांनी चंद्रकांतदादांच्या या ऑफरवर व टीकेवर मार्मिक भाष्य केले.

Jayant Patil_chandrakant Patil
जयंत पाटलांनी फुंकले रणशिंग : मिरजेचा पुढील आमदार राष्ट्रवादीचाच

जयंत पाटील म्हणाले,‘‘दादांना हे नक्की माहीत आहे की सोन्याचा मुकुट कोणालाच द्यायची वेळ येणार नाही. त्यामुळे ते जोरात घोषणा करीत आहेत. वेळ आली की त्यांना ते कळेलच. विरोधकांचा एकेरी उल्लेख करणे महाराष्ट्राची संस्कृती नाही. मात्र सत्ता गेली की लोक भ्रमिष्ट तरी होतात किंवा त्यांचा तोल तरी जातो. दादांबाबत नेमके काय झाले, याचे संशोधन व्हायला हवे. ते ज्यांना नेते मानतात, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारसाहेबांचे बोट धरून राजकारणात आल्याचे सांगितले आहे. मोदींच्याबाबतीतही असा एकेरी उल्लेख ते खासगीत करीत असावेत.’’

Jayant Patil_chandrakant Patil
तेव्हा ५७ लाख वाटले; पण गणपतराव देशमुख गटाला हिसका दाखवला

लस गरिबांच्या खिशातले पैसे काढूनच

पेट्रोल-गॅसची दरवाढ लस फुकट दिल्यानेच करावी लागल्याचे भाजपचे नेते सांगत आहेत. यावर टीका करताना जयंत पाटील यांनी लस जनतेच्या खिशातून पैसे काढून लस दिली आहे. तीच लस फुकट दिल्याची जाहिरात मात्र भाजप मोदींचे फोटो लावून केली जात आहेत. शेतकरी, वाहनधारक, गरीब गृहिणी यांचे पैसे इंधनदरवाढीतून काढून घेतल्याचेच ते मान्य करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com