Sangli News : आयुक्तांचा दांडी बहाद्दरांना दणका! 37 कर्मचाऱ्यांचे एकाच वेळी निलंबन, नोकरीतील हलगर्जीपणा नडला

Municipal Commissioner Suspends 37 Employees : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत विनापरवाना आणि कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कामावरून दीर्घकाळ गायब राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कडक कारवाईला सामोरं जावे लागले आहे.
sangli miraj kupwad municipal corporation
sangli miraj kupwad municipal corporationsarkarnama
Published on
Updated on

Sangli News : अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता, तसेच वैध रजा मंजूर नसताना सलग 90 दिवसांपेक्षा जास्त काळ गैरहजर राहणाऱ्या महापालिकेच्या 37 कर्मचार्‍यांना आयुक्तांनी दणका दिला आहे. महापालिका आयुक्त संजीता महापात्र यांनी त्यांना सेवेतून तत्काळ निलंबित केले आहे. तर त्यांची विभागीय चौकशी सुरू केली आहे. या कारवाईमुळे कर्मचारी वर्गात खळबळ उडाली असून कामचुकारपणा करणार्‍या कर्मचार्‍यावर अशीच कठोर कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त महापात्र यांनी दिला आहे.

महानगरपालिकेतील नागरी सुविधा आणि अत्यावश्यक सेवांमध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देत आयुक्तांनी सर्वांत मोठी कारवाई केली आहे. कामचुकार कर्मचार्‍यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारत क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वॉर्ड मुकादम, स्वच्छता निरीक्षक आणि सहाय्यक आयुक्तांमार्फत हजेरी मस्टरची कसून तपासणी करण्यात आली.

यावेळी विविध विभाग सक्षम प्राधिकार्‍यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आणि रजा मंजूर नसताना सलग 90 दिवसांपेक्षा जास्त काळ अनधिकृतपणे गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांची जंत्रीच समोर आली. यावेळी आयुक्तांनी 37 कर्मचार्‍यांना महापालिका सेवेतून तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले. या सर्व कर्मचार्‍यांवर केवळ निलंबनाची कारवाई न करता, ’महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार बडतर्फीची कारवाई प्रस्तावित करण्यासाठी विभागीय चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे.

sangli miraj kupwad municipal corporation
Chhatrapati Sambhjinagar Municipal Corporation : पाणी पुरवठ्याचे टप्पे कमी करण्यात अपयशाची कबुली, तरी महापौरांकडून व्हिजन 2047 संकल्प!

यावेळी विविध विभाग सक्षम प्राधिकार्‍यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आणि रजा मंजूर नसताना सलग 90 दिवसांपेक्षा जास्त काळ अनधिकृतपणे गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांची जंत्रीच समोर आली. यावेळी आयुक्तांनी 37 कर्मचार्‍यांना महापालिका सेवेतून तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले. या सर्व कर्मचार्‍यांवर केवळ निलंबनाची कारवाई न करता, ’महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार बडतर्फीची कारवाई प्रस्तावित करण्यासाठी विभागीय चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे.

यानंतर क्षेत्रीय कार्यालय-१ मधील ७ कर्मचारी, दोनमधील १२, तीनमधील ६ आणि चारमधील २ कर्मचारी निलंबित केले आहेत. यात सर्वाधिक सफाई कामगार आहेत. पाणीपुरवठा विभागातील ५ बहुउद्देशीय कामगार, अग्निशमन विभागातील १ शिपाई, जलनिस्सारण विभागातील १ बहुउद्देशीय कामगार, बांधकाम विभागातील १ शिपाई, सुरक्षा विभागातील १ वॉचमन, चौकीदार निलंबित करण्यात आला आहे.

या कर्मचाऱ्यांवर केवळ निलंबनाची कारवाई न करता, ‘महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९’च्या नियम ८ नुसार मोठी शिक्षा प्रस्तावित करण्यासाठी विभागीय चौकशीदेखील सुरू केली आहे. निलंबन कालावधीतील अटी निलंबन काळात ‘त्या’ ३७ कर्मचाऱ्यांच्या कार्यालयासंबंधित विभागच राहील.

वरिष्ठांच्या लेखी परवानगीशिवाय कोणालाही शहर सोडता येणार नाही. खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. दरमहा ३० तारखेच्या आत तसे ‘स्वयं-प्रमाणपत्र’ सादर केल्याशिवाय उदरनिर्वाह भत्ता अदा केला जाणार नाही. त्यांच्या ताब्यातील दप्तर, मस्टर किंवा साहित्य ताबडतोब संबंधित कार्यालयाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

sangli miraj kupwad municipal corporation
Ahilyanagar Municipal Corporation : कर्ज प्रस्तावावरून सत्ताधाऱ्यांमध्येच ‘अबोला’? नगरसेवकांनी दांडी मारल्याने महासभा तहकूब, राजकीय वर्तुळात चर्चा रंगली

जे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करीत आहेत, त्यांचा योग्य सन्मान केला जाईल. कर्तव्यात कसूर करून प्रशासनाला आणि जनतेला वेठीस धरणाऱ्या एकाही कामचुकार कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही.

- संजीता महापात्र, आयुक्त, महापालिका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com