Kolhapur Politics : लोकसभेसाठी हातकणंगले-कोल्हापूरमध्ये काँग्रेसची जोरदार मोर्चेबांधणी!

Congress Preparation For Lok Sabha : गेल्या कित्येक वर्षात काँग्रेसने लोकसभेच्या दृष्टीने कोणत्याही हालचाली केल्या नव्हत्या.
Congress
CongressSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आली आहे. सगळ्याच पक्षांनी यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभेच्या दृष्टीकोनातून कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात काँग्रेसकडून बैठका घेण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे या दोन्ही मतदारसंघांची जबाबदारी आहे. आजपासून ते कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. या ठिकाणी ते दोन्ही मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. (Latest Marathi News)

Congress
Ajit Pawar News : मानलं अजितदादांना ! एका झटक्यात राष्ट्रवादी-शिंदेंच्या आमदारांना २५-२५ कोटी वाटले...

लोकसभा निवडणूक पुढील वर्षी होणार असल्याने आता त्यादृष्टीने बांधणी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. भाजपपाठोपाठ काँग्रेसने लोकसभा तयारीसाठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सावंतवाडीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ येथील पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक घेणार आहेत.

विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघात गेल्या कित्येक वर्षात काँग्रेसने लोकसभेच्या दृष्टीने कोणत्याही हालचाली केल्या नव्हत्या. मात्र या निवडणुकीत काँग्रेस तयारी करत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. या बैठकांची स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांकडूनही जय्यत तयारी करण्यात येत आहे.

Congress
Sharad Pawar - Rahul Gandhi : दिल्लीत मोठी राजकीय घडामोड, मोदींच्या भाषणापूर्वीच शरद पवार- राहुल गांधींमध्ये महत्वाची बैठक

पृथ्वीराज चव्हाण पुढील तीन दिवस कोल्हापुरमध्ये आहेत. या दौऱ्यात ते पक्षाच्या जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. कोणत्या भागात पक्षाची किती ताकद आहे? पक्षाच्या वाढीसाठी काय करता येईल? याचाही आढावा ते घेणार आहेत. आमदार सतेज पाटील, पी. एन. पाटील, जयश्री जाधव व ऋतुराज पाटील यांच्याशीही सविस्तर चर्चा करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com