Ajit Pawar Kolhapur Visit : उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुरू असतानाच कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिस धावले म्हणून...

Kolhapur Police : जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झालेल्या अचानक गोंधळामुळे पोलिसांची तारांबळ उडाली.
Kolhapur News
Kolhapur NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू असताना कागल तालुक्यातील कसबा सांगावमधील एका कुटुंबियांने सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला.

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झालेल्या अचानक गोंधळामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत आंदोलनकर्त्या कुटुंबाला ताब्यात घेत धीर दिला. वेळीच याकडे लक्ष दिल्याने एका चिमुरड्या मुलीचा जीव वाचला. (DCM Ajit Pawar Kolhapur Visit)

गावच्या स्थानिक राजकारणातून अतिक्रमण असलेल्या जागेत सागर पुजारी यांचे घर आठ महिन्यापूर्वी जमीनदोस्त केले. त्याठिकाणी अन्य अतिक्रमणाला हात न लावता केवळ पुजारी यांचे घर पाडले असल्याचा आरोप करत कुटुंबियांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी कुटुंबाचा आक्रोश पहायला मिळाला. पोलिस गाव गुंडांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kolhapur News
Ajit Pawar Speech Today : साताऱ्यात अजित पवार संतापले; काय आहे कारण...

उपमुख्यमंत्री अजित पवारांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक सुरू असताना बाहेर एका कुटुंबाने सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली. तात्काळ याची गंभीर दखल घेत पोलिसांनी आत्मदहन करणाऱ्या कुटुंबाला अडवत त्यांच्या हातातील ज्वलनशील पदार्थाचा कॅन काढून घेतला.

गावगुंडांचा त्रास आणि अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे मला उघड्यावर राहावे लागत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून मी बेघर झालो असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पुजारी कुटुंबियांनी केली आहे. तहसीलदार शिल्पा ठोकरे यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी यावेळी केली.

(Edited By-Ganesh Thombare)

Kolhapur News
Loksabha Election 2024: लातूर लोकसभेचा उमेदवार ठरेना अन् अमित देशमुखांना पडली धाराशिवची चिंता

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com