Sangola Politic's : दीपक साळुंखे शेकापच्या 50 वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावण्याच्या तयारीत?; मुंबईत घडामोडींना वेग

Panchyat Samaiti Sabhapati Election : सांगोला पंचायत समितीत शेकाप-दीपक साळुंखे आघाडीला बहुमत मिळाले असले तरी साळुंखे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे महायुतीची सत्ता येण्याबाबत तालुक्यात राजकीय चर्चा रंगली आहे.
Deepak Salunkhe
Deepak SalunkheSarkarnama
Published on
Updated on

Sangola, 10 March : सांगोला पंचायत समितीच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या आघाडीला नऊ जागा मिळाल्या आहेत. या आघाडीकडे बहुमत असल्याने शेकापचा सभापती होईल, अशी शक्यता असतानाच मुंबईतील घडामोडींमुळे त्या शक्यतेला धक्का लागण्याची चिन्हे आहेत. साळुंखे यांच्या भाजप प्रवेशाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. साळुंखेंच्या भाजपप्रवेशानंतर पंचायत समितीत महायुतीची सत्ता येऊ शकते आणि त्याचीच चर्चा सांगोला तालुक्यात रंगली आहे.

सांगोला (Sangola) पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकापने दीपक साळुंखे गटासोबत आघाडी करत निवडणूक लढवली होती. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपची युती होती. पंचायत समितीच्या १४ जागांपैकी शेकापने सहा, तर दीपक साळुंखे यांच्या गटाने तीन जागा जिंकल्या आहेत. या आघाडीकडे स्पष्ट बहुमत आहे. शिवसेनेला चार, तर भाजपला एक जागा मिळालेली आहे.

शेकाप-साळुंखे गटाची आघाडी कायम राहिली तर सभापतिपद शेकापकडे जाण्याची शक्यता असून सोनंद गणातील काजल काशीद यांचे नाव सभापतिपदासाठी आघाडीवर आहे. दीपक साळुंखेंचा (Deepak Salunkhe) भाजप प्रवेश झाला तर त्यांच्या गटाच्या पूनम इंगवले यांचेही नाव पुढे येत आहे‌. शिवसेनेकडून माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सूनबाई कडलास गणामधून जिंकलेल्या राणी पाटील यांच्या सभातपदीसाठी ते आग्रही आहेत.

पंचायत समिती सभापती निवडीत माजी दीपक साळुंखे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. सध्या ते कोणत्याही पक्षात नसल्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची सांगोल्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. साळुंखे जिकडे जातील, त्या आघाडी किंवा युतीची सत्ता येणार हे निश्चित आहे.

Deepak Salunkhe
Rashmi Bagal : भाजपने रश्मी बागलांवर सोपवली ZPतील महत्वाची जबाबदारी; अध्यक्षपदाच्या शर्यतीतील नावे पडली मागे

साळुंखे गटाच्या कार्यकर्त्यांची नुकतीच एक बैठक झाली. तीत साळुंखे यांनी सत्ताधारी भाजपत प्रवेश करावा, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली आहे. साळुंखेंच्या भूमिकेकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे सांगोला तालुक्यातील बहुतांश नेते सध्या मुंबईत आहेत. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे हेही राजधानीत आहेत. साळुंखे यांच्या भाजप प्रवेशाच्या संदर्भाने मुंबईत बैठका सुरू असल्याची चर्चा आहे.

Deepak Salunkhe
Miraj Panchayat Samiti : सांगली ZP अध्यक्ष निवडीआधी भाजपला मोठा धक्का : अजितराव घोरपडेंनी मिरज पंचायत समितीतील सुरेश खाडेंची सत्ता उलथवली

दीपक साळुंखे हे भाजप, शिवसेना किंवा इतर पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना भेटल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे साळुंंखेंचा भाजप प्रवेश घडवून पालकमंत्री जयकुमार गोरे हे सांगोल्यात महायुतीचा सभापती करू शकतात. त्यामुळे संपूर्ण सांगोला तालुक्याच्या नजरा सध्या मुंबईतील घडामोडींकडे लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com