
Solapur, 20 June : राज्यात देवाभाऊचे सरकार आहे. अनेक वर्षे अफजल खानाची कबर काढण्याची मागणी होती. मात्र, देवाभाऊचे सरकार आल्यावर ती काढून टाकण्यात आली. आता अक्कलकोट एसटी स्टँडमधून रस्ता तर सोडाच, आतमधील अतिक्रमणांवर बुलडोजर चालणार आहे. येत्या आठ दिवसांत अतिक्रमण झालेल्या जागेवर देवाभाऊचा बुलडोझर चालणार म्हणजे चालणार, असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.
अक्कलकोट येथील बसस्थानकातून रस्ता देण्याच्या मागणीच्या विरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होत्या. या मोर्चात आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार संग्राम जगताप, आमदार देवेंद्र कोठे सहभागी झाले होते. त्यानंतर झालेल्या सभेत आमदार पडळकर यांनी हा इशारा दिला आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही. जर त्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी (Sambhaji Maharaj) धर्मांतरण केले असते, तर आज तुम्ही या चौकामध्ये आला असता का? आणि मी या चौकातून बोलू शकलो असतो का? छत्रपती संभाजी महाराजांनी 300 वर्षांपूर्वी धर्मांतरण केलं नाही आणि आज आपण दवाखान्यात उपचारासाठी 10, 000 दिले म्हणून धर्म बदलतो, घरासाठी थोडी जागा दिली म्हणून धर्म बदलतो, असा टोलाही गोपीचंद पडळकर यांनी लगावला.
पडळकर म्हणाले, अक्कलकोट (Akkalkaot) तालुक्यातील चपळगाव, मैंदर्गी येथेही अतिक्रमण आहे. तेथील अतिक्रमणे अद्याप काढलेली नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण झालेल्या जागेवर बुलडोझर चालवून काढून टाकावे. जर ते नाही काढले तर आम्ही सहन करणार नाही.
अक्कलकोटमध्ये हिंदू मुलगी लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकली होती. मात्र, त्या मुलीला आम्ही परत आणलेय आणि आता त्या जिहाद्यांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे हिंदूंनो वेळीच जागे व्हा, नाहीतर ते कोणालाही सोडत नाहीत. आज जयसिंगपूरमधील पोराने एक हिंदू मुलीला पळवून नेलंय. आता विवाहित महिलांना टार्गेट केले जातंय. विवाहित महिलांना विश्वासात घेतले जाते आणि फोटो काढून त्यांना ब्लॅॅकमेल केले जाते, असेही पडळकर यांनी स्पष्ट केले.
गोपीचंद पडळकर म्हणाले, 2011 ला हिंदू 96.63 कोटी, तर मुस्लिम 17.22 कोटी आणि रोहिंग्या किंवा बांगलादेशी 2 कोटी तर ख्रिश्चन 2.78 कोटी होते. 2011 नंतर 2025 मध्ये आकडा येईल, तेव्हा आपले चाललेय हम दो हमारे दो. पण तिकडे हम चार हमारे....
मुस्लिमांना सर्वात सेफ देश कोणता असेल तर तो भारत आहे. काश्मीरमधील नेते गुलाम नबी आझाद हे सांगत आहेत. मग इथे तुम्हाला XXX उठलाय का?. मुस्लिम म्हणतात की हिंदू आमच्यावर हल्ले करत आहेत. मग पाकिस्तान, इराण, इराक इकडे कोण हल्ला करतंय? तिथे कुठे हिंदू आहेत, असा सवालही त्यांनी केला.
इथून पुढे महाराष्ट्रात कोणी धर्मांतरण करणारा गावात, वस्तीवर आला तर त्याला ठोकून काढा. सरकारला आमची मागणी आहे की धर्मांतर विरोधी कायदा आणावा, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.