

Satara, 30 August : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाबाबत बोलताना शेखर गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शब्द न पाळल्याचा आरोप केला. तसेच, माणमध्ये मंत्री गोरेंच्या विरोधात तुमचा चेहरा ओळखला जातो, यावरही त्यांनी थोड्या दिवसांनी बरीच काही माहिती मी तुम्हाला देणार आहे, तोपर्यंत ‘वेट ॲण्ड वॉच’ असे सांगत शेखर गोरे यांनी आगामी राजकीय वाटचालीबाबत सूचक इशारा दिला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी संचालक शेखर गोरे बॅंकेत आले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना प्रवेश, भाजपने दिलेला शब्द पाळला नाही व पुढील राजकीय वाटचालीबाबत भाष्य केले.
शेखर गोरे म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला विधान परिषदेचा शब्द दिला होता. पण तो शब्द पाळला गेला नाही, त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेना प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झालेली आहे. पण प्रवेशाची तारीख अजून ठरलेली नाही. येत्या दोन दिवसांत पक्षप्रवेशाची तारीख जाहीर केली जाईल, असे सांगून तुमची नाराजी नेमकी कोणावर आहे, यावर ते म्हणाले, माझी नाराजी कोणावर आहे, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे.
शिवसेना पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत होणार असून त्यानंतर माण तालुक्यात कार्यक्रम होईल. माझ्यासोबत माझे सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यही शिवसेनेत येतील, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
माणमध्ये जयकुमार गोरे यांच्या विरोधात तुमचा चेहरा ओळखला जातो, त्यावर शेखर गोरे यांनी थोड्या दिवसांनी आणखी बरीच काही माहिती मी देणार आहे. त्यामुळे आता ‘वेट ॲण्ड वॉच’ असे सांगत त्यांनी अधिक बोलणं टाळले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.