Satej Patil News: मुख्यमंत्र्यांचं 'ते' विधान म्हणजे 'ATS' अन् 'NIA' या तपास यंत्रणांवरच संशय; सतेज पाटलांचं गंभीर विधान

Satej Patil On Devendra Fadnavis : काँग्रेसकडे बोट दाखवताना विचार करायला हवा. कारण अजितदादा आमच्या शेजारी बसत होते. हे मुख्यमंत्री महोदय यांना कदाचित लक्षात नसेल. असा खोचक टोला माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी लगावला.
Satej Patil
Satej PatilSarkarnama
Published on
Updated on
  1. मुख्यमंत्री फडणवीसांच्या विधानावर सतेज पाटलांचा पलटवार
    ATS आणि NIA संस्थांवर संशय निर्माण करणाऱ्या फडणवीसांच्या विधानावर माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी तीव्र टीका केली.

  2. मंत्री कोकाटे प्रकरणावरून भाजपवर टीका
    सतेज पाटील म्हणाले की भाजप मित्र पक्षांपुढे हतबल आहे; मंत्र्यांचं वर्तन असंविधानिक असलं तरी भाजपकडून दुर्लक्ष होत आहे.

  3. हत्ती प्रकरण, स्वाक्षरी मोहीम आणि बांधकाम कामगार योजना भ्रष्टाचार
    नांदणी हत्ती विषयावर स्वाक्षरी मोहीम व भ्रष्ट कामगार नोंदणीवर सतेज पाटील यांनी चिंता व्यक्त केली, योजनांचा गैरवापर थांबवण्याची मागणी केली.

Kolhapur News : मुख्यमंत्र्यांनी अशाप्रकारची टीका करणं संयुक्तिक नाही. गृहखात्याचा सरकारवर दबाव असतो, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी करणे चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांचे विधान म्हणजे ATS आणि NIA या संस्थावर संशय व्यक्त करण्यासारखे असल्याचं गंभीर विधान आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केलं आहे.

ATS आणि NIA ची व्यवस्था 15 वर्षात चुकली असं मुख्यमंत्र्यांना म्हणायचं आहे का? जे पुरावे त्यांना दिसले त्यानुसार अधिकाऱ्यांनी तपास केला. त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या का ? या सर्वाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. काँग्रेसकडे बोट दाखवताना विचार करायला हवा. कारण अजितदादा आमच्या शेजारी बसत होते. हे मुख्यमंत्री महोदय यांना कदाचित लक्षात नसेल. असा खोचक टोला माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. ते कोल्हापुरात बोलत होते.

सतेज पाटील म्हणाले, ATS आणि NIA ची व्यवस्था 15 वर्षांत चुकली असं मुख्यमंत्र्यांना म्हणायचं आहे का? जे पुरावे त्यांना दिसले त्यानुसार अधिकाऱ्यांनी तपास केला. त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या का ? या सर्वाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. काँग्रेसकडे बोट दाखवताना विचार करायला हवा. कारण अजितदादा आमच्या शेजारी बसत होते. हे मुख्यमंत्री महोदय यांना कदाचित लक्षात नसेल. असा खोचक टोला माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला. ते कोल्हापुरात बोलत होते.

Satej Patil
Mahadev Munde SIT Probe : अखेर मुंडे-कराड यांना नको असलेल्या डॅशिंग अधिकाऱ्याची बीडमध्ये एन्ट्री : महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन

मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात बोलताना, मित्र पक्षांच्या वरचा भाजपचा दबाव कमी झाला आहे. पहिल्यांदा कोकाटेंचा राजीनामा घेणार अशा बातम्या भाजपच्या वतीने देण्यात आल्या.भाजपचे हतबलता यामध्ये दिसून येत आहे. दोन्ही मित्र पक्षांसमोर भाजपा हतबल आहे. मंत्री कसेही वागू देत. मंत्र्यांच्या बेडरूममध्ये पैशाची बॅग दिसले तरी चालते. मंत्री शेतकऱ्यांच्या बद्दल काही बोलले तरी आम्हाला काही चालतं. आमदार विधिमंडळात येवून मारामारी करतात तरीही आम्हाला चालतं अशी भाजपची भूमिका आहे. असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला.

21 जुलैला नांदणीचे शिष्टमंडळ मला भेटले , त्यावेळेला कोणत्याही परिस्थितीत हा हत्ती नांदणी मठात राहिला पाहिजे अशी भूमिका घेतली.निर्णय झाल्यानंतर तातडीने हत्तीला कसं काय घेऊन गेले. आम्ही लोक भावनेचा विचार करून स्वाक्षरी मोहीम राबवली. सकाळपर्यंत 1 लाख 75 हजार लोकांनी स्वाक्षरी केली.

Satej Patil
Ajit Pawar Politics : कोकाटेंची उचलबांगडी, अजित पवारांनी मारले एका दगडात दोन पक्षी

आज संध्याकाळी ही मोहीम थांबवणार, उद्या सकाळी स्वाक्षरीच्या फॉर्म राष्ट्रपतींच्याकडे पाठवून देऊ. आज काही अधिकारी येऊन भेटणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.. त्यातून निर्णय चांगला झाला तर आम्हाला आनंद असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

बांधकाम कामागर योजना भ्रष्टाचार संदर्भात बोलताना, बोगस नोंदणी होत असेल तर चुकीचे आहे.. कार्यकर्ते बांधकाम कामगार म्हणून नोंदणी होत असल्याचं कळतंय.सेंट्रींग वर कन्स्ट्रक्शन वर कामाला न गेलेला व्यक्ती देखील कामगार म्हणून नोंदणी करत आहे.

आता निवडणुका झाल्या आहेत त्यामुळे सरकारने जो योग्य कामगार आहे त्याच्यापर्यंत साहित्य कसं पोहोचेल हे पाहावे. अनेक एजंट नेमले गेले आहेत. हे सरकार एका पक्षाचा असल्यासारखं वागते.योजना खिरापतीसारख्या वाटल्या असेही आमदार पाटील म्हणाले.

Satej Patil
Mahayuti Politics : कोकाटेंना दणका बसताच शिंदेंचा मंत्री अलर्ट; योगेश कदमांकडून 'सावली बार'बाबत मोठा निर्णय!

प्रश्न 1: सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर कोणती टीका केली?
उत्तर: ATS आणि NIA वरील विधानामुळे शंका निर्माण होत असल्याचं पाटलांनी म्हटलं.

प्रश्न 2: माणिकराव कोकाटे प्रकरणी भाजपवर काय आरोप केले गेले?
उत्तर: भाजप मित्र पक्षांसमोर हतबल असून मंत्र्यांच्या गैरवर्तनाकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करण्यात आला.

प्रश्न 3: नांदणी हत्ती संदर्भात सतेज पाटील काय म्हणाले?
उत्तर: हत्ती मठातच राहावा म्हणून 1.75 लाख स्वाक्षरी घेऊन राष्ट्रपतींकडे पाठवण्याचा निर्णय घेतला.

प्रश्न 4: बांधकाम कामगार योजनेत कोणते गैरप्रकार उघड झाले?
उत्तर: नोंदणीसाठी अपात्र कार्यकर्त्यांची नोंद घेतली जात असल्याचे सांगून ही योजना खिरापतीसारखी वाटली जात असल्याची टीका झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com