Kolhapur News, 28 Apr : लोकसभा निवडणुकीला अद्याप दोन ते तीन वर्ष बाकी असले तरी खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी म्हणून भाजपच्या नेत्यांने तयारी दर्शवली आहे. पक्षाने संधी दिल्यास हातकणंगले मतदार संघातून भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास आपण सज्ज असल्याची घोषणा माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी केली आहे.
आवाडे यांनी याबाबतची घोषणा केल्यानंतर माने विरुद्ध आवाडे या राजकीय संघर्ष पुन्हा एकदा निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 2029 ची लोकसंभा निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले जाते. त्याच पार्श्वभूमीवर आवाडे यांनी केलेले विधान शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातील संघर्ष वाढवण्याची शक्यता आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे सध्या शिवसेना शिंद गटाचे धैर्यशील माने हे प्रतिनिधित्व करीत आहेत. शिवसेना (शिंदे) आणि भाजप महायुतीतील घटक पक्ष आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आमदार आवाडे यांनी घेतलेल्या नव्या राजकीय भूमिकेमुळे खळबळ उडाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आवाडे यांनी आपली उमेदवारी दाखल केली होती.
नंतर मात्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर माघार घेतली होती. खासदार माने यांच्या विजयात आवाडे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. सध्या शिवसेनेचे सहयोगी शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची सोयरीक झाली आहे. शिवाय भाजपने देखील हातकणंगले मतदारसंघात संघटन मजबूत केले आहे.
लोकसभा निवडणुकीला तीन वर्षाचा कालावधी आहे; पण आताच आवाडे यांनी भाजपकडून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाने संधी दिली तर लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. 'भाजपच्या पंडित दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत हातकणंगले व वडगाव मंडल प्रशिक्षण वर्ग नरंदे येथे आयोजित करण्यात आले होते. येथे मार्गदर्शनासाठी आवाडे यांना निमंत्रित केले होते.
त्यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यानंतर समाज माध्यमातून त्यांची ही भूमिका झपाट्याने व्हायरल झाली. आवाडे यांच्या या अनपेक्षित भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुळात आवाडे आणि माने हे गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक राजकीय विरोधक आहेत. त्यांच्यात सतत राजकीय संघर्ष होत आला आहे. प्रकाश आवाडे यांच्या नव्या भूमिकेमुळे आवाडे आणि माने यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.