

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या सुरू झालेल्या राजकारणाचे पडसाद आता जिल्ह्यात उमटू लागले आहेत. महायुतीतील घटक पक्षांमध्ये जुंपली असताना जिल्हा बँकेच्या निमित्ताने दोन कट्टर राजकीय विरोधकांच्या दुश्मनीला सॉफ्ट कॉर्नर मिळत आहे. विकासाच्या मुद्द्यांवर राजकीय वैर बाजूला ठेवून घेतलेल्या गाठीभेटीमुळे अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत.
आमदार अमल महाडिक व आमदार सतेज पाटील यांनी एकमेकांच्या भेटीचं कारण स्पष्ट केल्यानंतर जिल्ह्यात वेगळीच चर्चा सुरु झालीय. तर दुसरीकडे गोकुळमध्ये सुरु असलेल्या घटनानी महायुतीत असूनही महाडिक गटाचे मुश्रीफ शत्रू असा समज निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा बँकेच्या बैठकीत आमदार अमल महाडिक आम्हाला भेटतात पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आम्हाला भेटत नाहीत.
असा चिमटा काढला होता. आमदार अमल महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांचा गट हा एकमेकांचा कट्टर राजकीय विरोधक आहे. एरवी शुल्लक कारणावरून हे दोन गट एकमेकांवर तुटून पडतात. मात्र अलीकडच्या राजकारणात आमदार अमल महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्या दुश्मनीतील सॉफ्ट कॉर्नर सुरू आहे.
जिल्हा नियोजनच्या सभेत कोल्हापूर विमानतळ शेजारील असलेल्या तामगाव रस्त्या संदर्भात आमदार अमल महाडिक यांनी ऋतुराज पाटील यांचा सल्ला घेण्याची विनंती केली. तर काही दिवसापूर्वी थेट सतेज पाटलांनी आमदार अमल महाडिक यांचे नाव घेतल्याने सर्वांना आश्चर्यचा धक्का बसला. त्यावर अमल महाडिक यांनीही याला दुजोरा दिला. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकमेकांना भेटतो. तर सतेज पाटलांनीही जिल्हा बँक आमची मातृसंस्था आहे.
विकासाच्या मुद्द्यावर आम्ही राजकीय जोडे बाहेर ठेवून भेटत असल्याचे सांगितले. दोघांनीही दिलेल्या स्पष्टीकरणानंतर कार्यकर्तेही आश्चर्यचकित झाले आहेत. इतकेच नव्हे तर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांचे बंधू संजय डी पाटील हे खाजगी कार्यक्रमात एकमेकांच्या जवळ बसल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले.
तर दुसरीकडे काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी वारंवार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे गोकुळच्या राजकारणाच्या निमित्ताने चिमटे काढले आहेत. मैत्रीत सर्व काही चालते. त्यामुळे मुश्रीफ आमदार पाटील यांचे काही मनावर घेणार नाहीत. पण महायुती म्हणून आमदार अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक व मंत्री हसन मुश्रीफ एकत्र असले तरी अप्रत्यक्षपणे महाडिक विरुद्ध मुश्रीफ असा संघर्ष सुरु झाला आहे.
महाडिक गटाकडून महायुती म्हणून लढण्याचा मानस बोलून दाखवत असला तरी मंत्री मुश्रीफ यांनी बेदखल केल्याचा राग महाडिक गटाला आहे. बिनविरोध करण्याच्या चर्चेवेळी महाडिक वगळता सर्व नेत्यांची मुश्रीफ गटाने घेतली भेट ही चांगलीच जिव्हारी लागली. त्यामुळे गोकुळमध्ये थेट अदृश्य शक्तीने लक्ष केंद्रित करून आमदार शिवाजी पाटील आणि महादेव दूध संस्थेचे प्रकाश बेलवाडे यांना ताकद दिली.
पण मुश्रीफ गटाला या अदृश्य शक्ती हा महाडिक गट असल्याचा संशय आहे. त्यामुळे राजकीय पटलावरचे नावे शत्रू हे मुश्रीफचं ठरले आहेत की काय? अशी शंका आहे. शिवाय महाडिक व पाटील यांच्या दुश्मनीतील सॉफ्ट कॉर्नर हा भविष्यातील राजकारणची पेरणी आहे की काय? याची शंका कोल्हापूरकरांना आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.