Dhangar Reservation News : धनगर समाजाचा मोर्चा आता मुंबईकडे ? सरकारला दिला 'हा' इशारा...

State wide Morcha for Reservation : आंदोलन तीव्र करण्याचा राज्यव्यापी मेळाव्यात निर्धार.
Dhangar Reservation
Dhangar Reservation Sarkarnama
Published on
Updated on

- सल्लाउद्दिन चोपदार

Mhaswad News : धनगर समाजास एसटीचे आरक्षण आहे. पण धनगर या शब्दाचा धनगड असा उल्लेख केला गेल्याने त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळू शकत नाही. आगामी काळात सर्व आमदार, खासदारांनी लक्ष घालून धनगड या शब्दाऐवजी धनगर हा शब्द दुरुस्त करून एसटी प्रवर्गातून सवलत मिळावी. यासाठी केंद्र व राज्य सरकारने राष्ट्रपतींकडे दुरुस्तीसाठी शिफारस करावी. (Dhangar Reservation)

अन्यथा राज्यातील सर्व धनगर बांधवांनी एकत्रितपणे लढा उभारुन रास्तारोको करत मुंबईत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार राज्यव्यापी धनगर समाजाच्या मेळाव्यात करण्यात आला. धनगर समाजास एसटीच्या सर्व सवलती सरकारने द्याव्यात, या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील म्हसवड पालिका कार्यालय समोर दि. 26 जानेवारीपासून ऊत्तम विरकर, जयप्रकाश हुलवाल व गणेश केसकर या तीन तरुणांनी आमोरण उपोषण सुरु केले आहे.

Dhangar Reservation
Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या तोंडावर ममतांना धक्का? खासदाराचा सरकारी समित्यांचा राजीनामा

ते अखंडीतपणे सुरु असून उपोषणकर्त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील धनगर समाज बांधवानी आज राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यास माण, खटाव, फलटण, खंडाळा, माळशिरस, सांगोला, औसा, लातूर, पंढरपूर, कवठेमहांकाळ, आटपाडी, जत, कोल्हापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच आमदार जयकुमार गोरे, अनिल देसाई, लक्ष्मण हाके, ॲड. सचिन जोरे, दादासाहेब हुलगे, बाळासाहेब काळे, बाळासाहेब मासाळ, डॉ. प्रमोद गावडे, बबनदादा विरकर, दादासाहेब दोरगे, माजी नगराध्यक्ष भगतसिंह विरकर, आप्पासाहेब पुकळे, मामुशेठ विरकर, धिरज खटके, डॉ. वसंत मासाळ, बाबासाहेब माने, शरद गोरड, ॲड. नितिन कटरे, ऊषा कोडलकर, सविता घटुकडे, डॉ. आरती माने - गावडे, आशाताई विरकर, विलासीबाई विरकर, सारिका धायगुडे, शोभा पांडुले उपस्थित होत्या.

या आंदोलनास विभागातील धनगर समाजासह इतर जाती - जमातींचा पाठिंबा मिळत आहे. याठिकाणी दिवस - रात्र गजी पथके नृत्याचा फेक धरत आहेत. रात्री पारंपारिक धनगरी ओव्या गायनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यातून धनगर समाज आपले प्रश्न पोटतिडकीने मांडू लागले आहेत. तसेच सणगर व मुस्लिम समाजानेही या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

मेळाव्यात आंदोलकांसह महिलांनीही डोक्यावर पिवळ्या टोप्या, फेटा परिधान करत पिवळ्या भंडाऱ्याची उधळण केली. यावेळी येळकोट येळकोट... जय मल्हार... च्या घाेषणांनी धनगर समाज बांधवांनी हा मेळावा दणाणून सोडला. हरणाई सहकारी सुत गिरणीचे अध्यक्ष काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख, भाजपाचे धैर्यशील मोहिते - पाटील, राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप यांनी भेट देवून आंदोलनास पाठिंबा दर्शविला.

(Edited by Amol Sutar)

Dhangar Reservation
ED Target : ईडीच्या सापशिडीत विरोधकांचा होतोय ‘गेम’; कोण साधतेय नेमका नेत्यांवर नेम?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com