Pandharpur-Mangalvedha Politics : पोटनिवडणुकीत बाजी पलटवणारे परिचारक सहा महिन्यांतच आवताडेंपासून का दुरावले?

BJP Leader's Dispute : आवताडेंनी पंढरपुरात लक्ष घालायला सुरुवात करताच परिचारक गटात अस्वस्थता पसरू लागली.
Prashant Paricharak- Samadhan Avtade
Prashant Paricharak- Samadhan Avtade Sarkarnama
Published on
Updated on

Solapur News : पंढरपूर-मंंगळवेढा पोटनिवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी हक्क असूनही माघार घेऊन समाधान आवताडे यांना तिकिट देण्यास सहमती दर्शवली होती. त्यासाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्वाची ठरली होती. फडणवीसांच्या सूचनेनुसारच आवताडे यांच्यासाठी परिचारक यांनी पोटनिवडणुकीत सर्वाधिक कष्ट घेतले. मात्र, काही महिन्यांनंतरच या दोन नेत्यांमधील एकोपा सैल पडू लागला. पुढील काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून दोघांमध्ये आता मतभेदांचा पूल शिल्लक राहिला आहे. (Dispute between MLA Samadhan Avtade and Prashant Paricharak within six months)

विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून प्रशांत परिचारक यांनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०१९ मध्ये सुधाकर परिचारक हे विधानसभेला लढले होते. त्यामुळे पोटनिवडणुकीतही उमेदवारीवर प्रशांत परिचारक यांचा पहिला दावा होता. मात्र, जागा जिंकून आणायची असेल तर परिचारक आणि समाधान आवताडे यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, ते चाणाक्ष देवेंद्र फडणवीसांनी ओळखले. त्यानुसार सूत्रे हलवत आवताडे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यासाठी परिचारक यांची समजूत घालण्यात आली. नुसती समजूतच घालण्यात आली नाही तर परिचारक यांच्या हाती प्रचाराची सर्व सूत्रे दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prashant Paricharak- Samadhan Avtade
Sangli Politics : जयंतराव-विश्वजित कदमांना अजितदादा देणार धक्का; जयश्रीताईंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित

परिचारक पायाला भिंगरी बांधून प्रचारासाठी फिरले. पंढरपुरातून त्यांनी आवताडे यांना निसटते मताधिक्क मिळवून दिले होते. त्यामुळे समाधान आवताडे आमदार होण्यात परिचारक यांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, आवताडे आमदार झाल्यानंतर काही बैठकांना परिचारक यांना बोलावण्यात आले नाही. तसेच, आवताडेंनी पंढरपुरात लक्ष घालायला सुरुवात करताच परिचारक गटात अस्वस्थता पसरू लागली आहे. आवताडेंनी जरी परिचारक गटाला लक्ष्य केले नसले तरी तालुक्यातील राजकीय प्रवेश परिचारक गटाला रूचला नाही.

आवताडे यांच्या भूमिकेमुळे प्रशांत परिचारक यांनीही आपला गट शाबूत राहावा, यासाठी मंगळवेढ्यात लक्ष घालायला सुरुवात केली. परिचारकांचा मंगळेवढ्यात अगोदरच एक गट होता. त्याला ताकद देण्यास परिचारकांनी सुरुवात केली. पुढे श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली.

दामाजी कारखान्याची निवडणूक लढविण्याचा मंगळवेढ्यातील कार्यकर्त्यांना आग्रह केला. तालुक्यातील परिचारक गट जिवंत ठेवण्यासाठी परिचारक यांनीही कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्यास संमती दिली. विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वी पाेटनिवडणुकीत ज्यांना कडाडून विरोध केला, त्या भालके गटाबरोबर जात कारखान्याची निवडणूक लढविण्यात आली. विशेष म्हणजे परिचारक, भालके गटाने समविचारी आघाडीच्या माध्यमातून आमदार समाधान आवताडे यांच्या पॅनेलचा पराभव केला. त्याच ठिकाणी आवताडे-परिचारक गटामधील अंतर वाढायला सुरुवात झाली.

Prashant Paricharak- Samadhan Avtade
Gangster In Mantralaya : गुंडाचे मुख्यमंत्र्यांसोबत फोटोशूट; विरोधक म्हणतात, ‘हीच का ती मोदी गॅरंटी’

हे दोन्ही नेते एकमेकांना टाळत होते. आवताडेंच्या कार्यक्रम कधी परिचारक गैरहजर राहू लागले, तर पारिचारक यांच्याशिवाय पंढपुरातील बैठका होऊ लागल्या. चार दिवसांपूर्वीच आवताडेंनी पंढरपुरात कार्यक्रम ठेवला होता, त्या कार्यक्रमाला परिचारक यांनी दांडी मारली होती, त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये अंतर वाढले. त्यानंतरही आमदार समाधान आवताडे हे तीळगूळ द्यायला परिचारक वाड्यावर गेले होते. तो गोडवा मात्र कार्यकर्त्यांपर्यत पाझरला नसल्याचे दिसून येते.

Prashant Paricharak- Samadhan Avtade
Malegaon Tender Scam : एमआयएम आमदाराचे टेंडरसंदर्भात ‘ते’ वाक्य अन्‌ विरोधकांसह मित्रपक्षही तुटून पडले

परिचारक यांनी जानेवारीमध्ये आपल्या गटाची एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीत परिचारक यांनी विधानसभेसाठी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे. मात्र, खुद्द परिचारक याबाबत बोलायला तयार नाहीत. आवताडे यांनीही परिचारक यांच्यासोबतच्या मतभेदावर आतापर्यंत भाष्य केलेले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत या दोघांमधील दुरावा संपणार की दोघेही रिंगणात उतरणार हे येत्या वर्षभरात स्पष्ट होणार आहे.

Prashant Paricharak- Samadhan Avtade
Loksabha Election 2024 : 'मविआ'च्या विशाल पाटलांच्या पायाला भिंगरी, भाजपचे संजयकाका, देशमुखांचा भेटीगाठीवर भर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com