DY Patil passes away : पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांचं निधन, वयाच्या 90 व्या वर्षी कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास

Dr DY Patil Death : डी.वाय पाटील यांनी महाराष्ट्रात आणि देशात शिक्षणाचा विस्तार केला. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना १९९१ मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त होत आहे.
Dr DY Patil Death
Dr DY Patil DeathSarkarnama
Published on
Updated on

Dr DY Patil Death : महाराष्ट्रातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्यश्री डॉ. डी.वाय पाटील यांचं वयाच्या ९० व्या वर्षी निधन झालं. त्यांनी मंगळवारी (ता.४ ऑगस्ट) कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला.

डी.वाय पाटील यांनी महाराष्ट्रात आणि देशात शिक्षणाचा विस्तार केला. डी. वाय. पाटील समूहाअंतर्गत अनेक अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर उच्च शिक्षण संस्था स्थापन केल्या आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना १९९१ मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त होत आहे.

डॉ. डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) हे डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक असून महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई आणि कोल्हापूर येथे शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील अनेक संस्था त्यांनी उभारल्या आहेत. तांत्रिक, वैद्यकीय, दंतवैद्यकीय, कृषी, व्यवस्थापन आणि इतर उच्च शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे.

Dr DY Patil Death
Land Survey Maharashtra : आता जमीन फेरमोजणीचा हट्ट चालणार नाही! 2024 नंतरची मोजणी 'अंतिम'; राज्य सरकारचा मोठा निर्णय

त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल, त्यानंतर बिहारचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. तसेच पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला होता. शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा या क्षेत्रांतील त्यांच्या कार्यामुळे त्यांना देशातील अग्रगण्य शिक्षणतज्ज्ञांपैकी एक मानले जाते.

राजकीय प्रवास

डॉ. डी. वाय. पाटील यांनी सुरुवातीला काँग्रेस पक्षातून सार्वजनिक जीवनात काम केले. नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) मध्ये सहभागी झाले. २००९ ते २०१३ या काळात ते त्रिपुराचे राज्यपाल होते. २०१३ ते २०१५ या काळात त्यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. २०१४ मध्ये त्यांनी काही काळ पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला

Dr DY Patil Death
Mumbai Police Salary Scam : मुंबई पोलीस दलात कोट्यवधींचा पगार घोटाळा : गृहखात्याला चुना, तब्बल 6 वर्षांनंतर फुटलं बिंग

कुटुंब आणि नातेवाईक

त्यांचे पुत्र सतेज (बंटी) पाटील हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते असून, आमदार आणि राज्याचे माजी मंत्री आहेत. दुसरे पुत्र डॉ. संजय डी. वाय. पाटील हे डी. वाय. पाटील समूहाच्या शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावतात. सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नंदिता पालशेतकर या त्यांच्या कन्या आहेत. त्यांचे नातू ऋतुराज पाटील हे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आहेत.

दरम्यान, डी.वाय पाटील यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी उद्या (ता.5) सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत यशवंत निवास ,कसबा बावडा येथे ठेवलं जाणार आहे. अंत्ययात्रा सायंकाळी 4 वाजता निघणार आहे. तर सायंकाळी 5 वाजता डी. वाय.पाटील मेडिकल कॉलेज , लाईन बाजार येथे अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com