Devendra Kothe : देवेंद्र कोठेंच्या खरमरीत पोस्टनंतर पोलिस मध्यरात्रीच पोचले स्ट्रीट पार्कवर; मावा खाऊन थुंकणाऱ्यांवर कारवाई, दीड तास बसवून ठेवले

Solapur Clean Up News : सोलापूर शहरातील अस्वच्छतेबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर पोलिसांनी होम मैदान परिसरात कारवाई करत ३९ तरुणांना ताब्यात घेऊन समज देत सोडले.
Devendra Kothe
Devendra KotheSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 04 October : सोलापूर शहरातील रस्त्यांवर साठलेली धूळ, घाण आणि गवत पाहून आमदार देवेंद्र कोठे यांनी मध्यरात्री दीडच्या सुमारास महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. शहराच्या अस्वच्छतेला कामचुकार कर्मचारी जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच पान, तंबाखू आणि मावा खाऊन थुंकणारे नागरिकही दोषी आहेत. याबाबत आमदार कोठे यांनी सोशल मीडियातून पोस्ट केली होती. त्याची दखल घेत पोलिस उपायुक्त प्रीतम यावलकर यांच्या आदेशाने पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री होम मैदानाजवळील स्ट्रीट पार्क परिसरात कारवाई करत ३९ तरुणांना ताब्यात घेऊन दीड तास थांबवून ठेवले. काहींच्या पालकांनाही बोलावून त्यांच्यासमोर या तरुणांना कडम समज देऊन सोडून देण्यात आले.

सोलापूर महापालिकेची यंत्रणा दररोज रस्त्यांची स्वच्छता करते, पण मावा, तंबाखू खाऊन थुंकल्याने ते खराब होतात. यासंदर्भात आमदार देवेंद्र कोठे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्याची दखल घेऊन उपायुक्त प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास सदर बझार आणि फौजदार चावडी पोलिसांनी ही कारवाई केली.

सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारी यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक दिनेश कुलकर्णी, फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे फौजदार सतीश बावणे यांनी स्ट्रीट बझार येथे भेट दिली. त्यांच्यासोबत दंगा नियंत्रण पथक देखील होते. याशिवाय दोन्ही पोलिस ठाण्याचे अंमलदारही होते.

Devendra Kothe
Shinde Vs Gore : जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंवर पलटवार : ‘ दुष्काळी GR जाळणाऱ्या खासदारांच्या बुद्धीची किव येते; त्यांनी वडिलांकडून संस्कार शिकावेत’

पोलिसांनी सदर बझार येथे मध्यरात्री साडेबारा, एक वाजता विनाकारण थांबलेल्या तरुणांना ताब्यात घेतले. काहीजण पळून जाण्यात यशस्वीही झाले. पकडलेल्या सर्वांना तेथे उशिरापर्यंत थांबण्याची कारणे विचारण्यात आली. त्यांना पोलिस ठाण्यात नेऊन तास, दीड तास बसवून विचारपूस करण्यात आली. काहींच्या कुटुंबीयांनाही बोलावण्यात आले होते.

Devendra Kothe
Shahajibapu Patil : शहाजीबापू पाटील यांचं मोठं विधान : ‘आमचा पाठिंबा शिवसेनेला; मंगेश चिवटेंना नाही...’

पुन्हा दिसाल तर...

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्वांची नावे नोंदवहीत लिहून घेतली आणि त्या सर्वांना समज देऊन सोडण्यात आले. त्यांच्या पालकांनाही पोलिसांनी सांगितले. तरुण मावा, तंबाखू खात तेथे पब्जी खेळत होते. त्यांना पोलिसांनी कडक शब्दांत समज दिली आणि पुन्हा तेथे दिसलात, तर कारवाई करण्याचा इशाराही दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com