Chikhali Political Crime : बसप उमेदवारावर चिखलीत जीवघेणा हल्ला; प्रकृती चिंताजनक, बुलडाण्यात खळबळ

Assembly Election 2024 : बसपचे उमेदवार ॲड. चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. चिखली पोलिस हल्लोखोराचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे विधानसभा निवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट लागले आहे.
 Shankar Chavan
Shankar ChavanSarkarnama
Published on
Updated on

Buldana,02 November : चिखली विधानसभा मतदार संघातील बहुजन समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲड. शंकर चव्हाण यांच्यावर ४० ते ५० अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात शंकर चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चिखली येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेने बुलडाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, बसपचे (BSP) उमेदवार ॲड. चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. चिखली पोलिस हल्लोखोराचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे विधानसभा निवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट लागले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघातून (Chikhli Constituency) ॲड. शंकर चव्हाण हे बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. शुक्रवारी रात्री शंकर चव्हाण हे लक्ष्मी पूजन आटोपून आपल्या सहकाऱ्यांसह त्यांच्या स्वतःच्या मेहकर फाटा परिसरातील हॉटेल थांबले होते.

 Shankar Chavan
Assembly Election 2024 : शिंदेंच्या 'या' उमेदवाराच्या शपथपत्रात 16 प्रकारच्या गंभीर चुका, निवडणूक आयोगाने दिला 24 तासांचा वेळ

हॉटेलवर शंकर चव्हाण यांच्यासोबत त्यांचे सहकारीही होते. त्याच वेळी अज्ञात ४० ते ५० जणांचे टोळके आले. त्या टोळक्याने आल्यानंतर प्रथम शंकर चव्हाण यांना लाठ्या आणि काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत उमेदवार शंकर चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत.

हल्ला करून हल्लेखोर घटना स्थळावरून फरारी झाली आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. शंकर चव्हाण यांना जखमी अवस्थेतच चिखली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या हल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

 Shankar Chavan
Assembly Election 2024 : हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं शिंदेसेनेला भोवणार? निवडणूक आयोगाकडून कारवाई सुरू

दरम्यान, चिखली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. चिखली पोलिसांनी हल्लेखोरांची शोध मोहिम हाती घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com