Satara Politic's : साताऱ्याचे पालकमंत्रिपद मी कधीही मागितले नव्हते; शिंदेंच्या मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

Guardian Minister Shambhuraj Desai Statement : मी जेव्हा दुसऱ्यांदा साताऱ्याचा पालकमंत्री झालो, त्यावेळी मला फारसे वेगळे काही वाटले नाही. कारण, गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून मी पालकमंत्री होतो. त्यामुळे या जबाबदारीचे मला विशेष असे काही वाटले नाही, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desai Sarkarnama
Published on
Updated on

Karad, 02 February : महायुतीमध्ये पालकमंत्रिपदावरून एकीकडे धूसफूस सुरू असताना राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी ‘मला साताऱ्याचे पालकमंत्री करा, अशी मागणी मी कधीही केलेली नाही’ असे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला दुसऱ्यांदा साताऱ्याचे पालकमंत्री केले आहे, त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन मी साताऱ्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडणार आहे, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

कराड येथील शासकीय विश्रामृहात साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai ) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी साताऱ्याच्या पालकमंत्रिपदाबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे ‘मला पालकमंत्री करा’ अशी कधीही मागणी केली नव्हती. पण, शिंदे यांनी दुसऱ्यांदा मला साताऱ्याचे पालकमंत्री केले आहे. सर्वांना बरोबर घेऊन पालकमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडणार आहे.

मी जेव्हा दुसऱ्यांदा साताऱ्याचा (Satara) पालकमंत्री झालो, त्यावेळी मला फारसे वेगळे काही वाटले नाही. कारण, गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून मी पालकमंत्री होतो. त्यामुळे या जबाबदारीचे मला विशेष असे काही वाटले नाही, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

Shambhuraj Desai
Eknath Shinde Politic's : एकनाथ शिंदेंचे ग्रह फिरले; बालेकिल्ल्यात फडणवीसांचे विश्वासू लक्ष घालणार

खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत येऊन माझे अभिनंदन केले. त्यांनी सातारा जिल्ह्यातील अन्य मंत्री आणि आमदारांचेही स्वागत केले आहे. ते काही वेळ जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीलाही बसले होते. त्यांनी जिल्ह्यात महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले आहे, असेही देसाई यांनी नमूद केले होते.

Shambhuraj Desai
Maharashtra Politic's : 'अमित शाहांनी शब्द पाळला नाही, अपमानित केले, फसवणूक झाल्याची एकनाथ शिंदेंची भावना'

साताऱ्याच्या पालकमंत्रिपदाची मागणी कोणी केली होती, हे सर्वांना माहिती आहे. पण, मागणी कोण करतंय, त्यावरही बरंच अवलंबून असते. कोणी कोणासाठी मागणी केली आहे, हे आपल्याला माहितीच आहे. साताऱ्याच्या पालकमंत्रिपदावरून उठलेल्या वादंगावर कोणीही प्रतिक्रिया द्यायची नाही, अशी मी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मला साताऱ्याचे पालकमंत्री केले आहे, त्यांच्या विश्वासाला पात्र राहून चांगले काम करून दाखवू, असेही शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com