

Gokul Meeting : गोकुळमध्ये प्रशासक अस्तित्वात असल्याने आणि संचालक मंडळाची मुदत संपूनही निवडणूक वेळेत न झाल्याने यांना वार्षिक सर्वसाधारण सभा झाली नाही. त्यामुळे गोकुळची न झालेली वार्षिक सर्वसाधारण सभा ३० नोव्हेंबरपूर्वी घ्यावी लागणार आहे. ही वार्षिक सर्वसाधारण सभा गाजण्याची शक्यता आहे. अध्यक्ष निवडीचा न्यायालयीन लढा अजून सुरूच आहे. त्याची सुनावणी २५ नोव्हेंबरला आहे. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.
सहकारी संस्थांना त्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबरपूर्वीच घ्यावी लागते. या सभेचा वृत्तांत उपनिबंधकांकडे द्यावा लागतो. मात्र, गोकुळ दूध संघावर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती होती. तसेच तेथील वाद न्यायालयात असल्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी दोन महिन्यांची मुदत वाढ दिली आहे.
३० सप्टेंबरपूर्वीच सभा घ्यावी लागली, तर अहवाल छपाईपासून सर्वकाही तयारी प्रशासकीय मंडळाने केली होती. मात्र, दोन महिन्यांची मुदत वाढ मिळाल्यामुळे ही सभा होऊ शकली नाही. आता ३० नोव्हेंबरपूर्वी ही सभा घेणे आवश्यकच आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व संचालक गवोगावी, विशेष करून प्रत्येक तालुक्यात किमान एक जाहीर सभा घेतात. त्यामध्ये दूध उत्पादकांना गोकुळच्या कारभाराची माहिती देतात. त्यांना वार्षिक सभेपूर्वी विश्वासात घेतात. मात्र, आता इतका वेळ गोकुळच्या संचालकांकडे असणार नाही. अद्याप अहवाल छपाईची सुरुवात नाही. अहवालाची छपाई करताना त्यामध्ये यापूर्वीच्या संचालक मंडळासह, प्रशासकीय मंडळ आणि नूतन संचालक मंडळाची माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर सभेपुढील विषय अहवालात मांडावे लागणार आहेत. ऐनवेळच्या प्रश्नांची उत्तरेही नूतन संचालक मंडळाला द्यावी लागणार आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर आता वार्षिक सर्वसाधारण सभेचीही तयारी नूतन संचालकांना करावी लागणार आहे.
सभेच्या निमित्ताने त्यांना दूध उत्पादकांना सामोरे जावे लागणार आहे. ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीसाठी झालेला संघर्ष, टीकाटिप्पणी राज्यभर गाजली आहे. नेत्यांमधील वाद चर्चेचे ठरले आहेत. तसेच पहिल्यांदाच पक्षीय पातळीवरील सत्ता स्थापन झाली आहे. निवडणुकीनंतर महिन्यातच वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यावी लागणार आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे यावेळीही वार्षिक सर्वसाधारण सभा गाजणार असल्याचे दिसून येते.
सुनावणीनंतरच सभेची तारीख ठरणार सध्या झालेली अध्यक्ष निवड मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या आदेशाला अधीन राहून झाली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला आहे. त्या सुनावणीत अध्यक्ष निवडीबाबत काय निर्णय होतो, यावर पुढील कामकाज अवलंबून आहे. त्यामुळे २५ नोव्हेंबरनंतरच वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.