Gokul Election : 'गोकुळ'च्या जागावाटपात मंत्री हसन मुश्रीफांचा 'गेम' ! राष्ट्रवादी-भाजपचा समान वाटा, खिंडीत गाठलं

Hasan Mushrif BJP : सर्वाधिक ठराव असून देखील हसन मुश्रीफ यांची जागावाटपामध्ये भाजपने कोंडी केली आहे. 9-7-7-2 फाॅर्म्युला निश्चित झाल्याने भाजप जागावाटपात राष्ट्रवादीच्या बरोबरीला आल्याची चर्चा आहे.
Hasan Mushrif | Gokul Election 2026 | Mahayuti Seat Sharing
Hasan Mushrif | Gokul Election 2026 | Mahayuti Seat Sharing
Published on: 
Updated on: 

Gokul Politics : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीमध्ये जागावाटप करताना स्थानिक नेत्यांमध्ये प्रश्न सुटत नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गोटात चेंडू ढकलला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जागावाटप बाबत 9-7-7-2 असं फॉर्म्यूला निश्चित झाल्याचे समजते. तत्पूर्वी या निर्णयामुळे महायुतीमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण मंत्री मुश्रीफ यांनी 10 स्वतंत्र जागांची मागणी केली होती.

मंत्री मुश्रीफ यांना 9 जागा दिल्या जात असून त्यामधील एक जागा आमदार राजेंद्र पाटील- यड्राव्हकर यांना द्यावी लागणार असल्याने पून्हा एकदा मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महायुतीतील घटक पक्षांचे जागावाटप होत असताना ठरावाच्या संख्याबळाचा विचार करूनच जागावाटप केले जाईल, असा दावा भाजप सह राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात होता. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून ही देखील भाजपला पूरक असा निर्णय झाल्याचे दिसून येते.

महायुतीमध्ये सर्वाधिक ठराव हे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचा दावा आहे. त्यामुळे सर्वाधिक दहा जागांची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस कडे पूर्वीचे आणि ए वाय पाटील आल्यानंतर जवळपास त्यांच्या ठरावाचा आकडा हा 2000 पर्यंत पोहोचतो. तर भाजपने आपल्याकडे 1300, शिवसेनेने 1300 ठराव असल्याचा दावा केला आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्ती प्रदर्शन करत ठराव दाखल केले. यामध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या गटाचा देखील ठराव होते. त्यामुळे आमदार यड्रावकर यांना मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोट्यातून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी महायुतीतील घटक पक्षांकडून झाली होती. तर दुसरीकडे शिवसेनेमधून देखील काही ठराव यड्रावकर यांनी दिल्याने शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना उमेदवारी मिळावी, अशी ही मागणी अनेकांनी केली होती. तर शिवसेनेने स्वतंत्र सात जागा घेतल्या आहेत. मात्र मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोट्यातून यड्रावकर यांना उमेदवारी मिळत असल्याने सध्या मंत्री मुश्रीफ हे नाराज आहेत. यड्रावकर शिवसेना शिंदे गटाचे घटक पक्ष आमदार आहेत.

Hasan Mushrif | Gokul Election 2026 | Mahayuti Seat Sharing
Gokul Election News : गोकुळ दूध संघाचं अंतिम जागावाटप ठरलं, CM फडणवीसांचा ग्रीन सिग्नल : राष्ट्रवादी, भाजपसह कोणाला किती जागा?

दुसरीकडे भाजपने 1300 ठरावांवर सात जागा पदरात पडून घेतले आहेत. शिवसेनेच्या तुलनेत दोघांनाही समान जागा असल्या तरी ठराव दाखल करत असताना भाजपचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती यांनी एकत्र शक्तीप्रदर्शन करत ठराव दाखल केले होते. त्यामुळे घटक पक्ष असलेल्या मुळे जनसुराज्य शक्ती आणि भाजप यांची दोघांची जागावाटपाची संख्या पाहिली तर ती नऊ इतकी होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस 9 आणि भाजप 9 अशीच परिस्थिती या जागा वाटपामध्ये झाल्याने पुन्हा एकदा यावरून महायुतीमध्ये वाद होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

पक्षीय पातळीवरच जागावाटप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना हा निरोप दिल्याची खात्रीलायक माहिती ही आपल्याकडे आली होती. ठरावाच्या संख्याबळानुसार हे जागा वाटप होणार अशी शक्यता होती. मात्र पक्षीय पातळीवरच जागावाटप झाल्याचे प्राथमिक दिसत आहे. त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सूर उमटत आहे.

हसन मुश्रीफ नाराज?

राष्ट्रवादी आणि भाजपला समान प्रत्येकी 9-9 जागा देण्यात आल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी मधून यड्रावकरांना देखील संधी असणार आहे. त्याचबरोबर भाजपमधून जनसुराज्यला 2 जागांवर संधी देण्यात आल्याने मंत्री हसन मुश्रीफ हे नाराज आहेत. आणि याबाबतची नाराजी त्यांनी थेट वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे पुन्हा एखादा निर्णय रखडला असल्याचे सांगितले जाते.

Hasan Mushrif | Gokul Election 2026 | Mahayuti Seat Sharing
Gokul Election : गोकुळच्या जागावाटपात फडणवीसांनी 'राष्ट्रवादीला' चेपवलं : हसन मुश्रीफ नाराज; ‘बाहेरून पाठिंबा’ देण्याचा निरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com