Gokul Election Result Update : निकाल लागताच 'गोकुळ'चा अध्यक्ष ठरला! सतेज पाटील शब्द पाळणार, 'या' नेत्याला मिळणार संधी!

Satej Patil shashikant chuyekar: महायुतीमधील तीन पक्ष एकत्र आले होते. 10 आमदार आणि खासदाराची ताकद असूनही महायुतीला पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, सतेज पाटलांकडून अध्यक्षपदी कोण असणार हे निश्चित झाले आहे.
Satej Patil shashikant chuyekar
Satej Patil shashikant chuyekarsarkarnama
Published on: 
Updated on: 

Satej Patil News : 'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव निश्चित झाला असून सतेज पाटील यांची समविचार आघाडी 14 जागांवर पुढे आहे. समविचार आघाडी सत्तेत येण्याआधीच त्यांचे गोकुळचे अध्यक्षपद कोणाकडे असणार हे स्पष्ट झाले आहे.

निवडणुकीच्या काळात सतेज पाटील यांनी प्रचारात जाहीर केले होते की, आमची सत्ता आली गोकुळचे संस्थापक सदस्य आनंदराव पाटील चुयेकर यांचे पुत्र शशिकांत पाटील चुयेकर यांना अध्यक्ष करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे 'गोकुळ'चे अध्यक्ष शिशिकांत पाटील चुयेकर हे असतील हे निश्चित झाले आहे.

गोकुळचे संस्थापक अध्यक्ष कोण यावरून महायुती आणि समविचार आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यावेळी सतेज पाटील यांनी जाहीर भूमिका घेत थेट शशिकांत चुयेकर यांना अध्यक्षपद देण्याचे जाहीर केले होते.

सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती पुढे होती मात्र एक एक जागांवर आघाडी घेत समविचार आघाडी तब्बल 14 जागांवर पुढे गेली. तर, महायुती 11 जागांवर आहे. 25 जागा असलेल्या गोकुळच्या संचालक मंडळात बहुमतासाठी 13 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे सतेज पाटील यांची समविचार आघाडी सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाले आहे.

Satej Patil shashikant chuyekar
Gokul Election : गोकुळ 'अर्थव्यवस्था' अन् सत्तेची खरी चावी! आजचा निकाल राजकीय नेत्यांसाठी महत्त्वाचा का?

महायुतीचा पराभव का?

महायुतीमधील तीन पक्ष एकत्र आले होते. 10 आमदार आणि खासदाराची ताकद असूनही महायुतीला पराभव स्वीकारावा लागला. याचे मुख्य कारण म्हणजे महायुतीमधील अंतर्गत संघर्ष. जागा वाटपावरून महायुतीमध्ये संघर्ष होता. मुश्रीफ यांना काही नेत्यांनी टोकाचा विरोध केला. मुंबईतून जागा वाटप निश्चित झाल्यानंतर महायुतीमधील नेत्यांनी केवळ आपल्या तालुक्याचा विचार करत प्रचार केला.

Satej Patil shashikant chuyekar
Gokul News : ‘म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये म्हणजे झालं’ सतेज पाटलांचा टोमणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com