Gokul Politics : निवडणूक संपताच गोकुळच्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका! 350 जणांना कारणे दाखवा नोटीस, नेमकं कारण काय?

Gokul Action On Employees After Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल लागला असून आता अध्यक्ष निवडीचा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान गोकुळने 350 कर्मचाऱ्यांच्या विरोधात मोठा पाऊल उचललं आहे
Gokul  Dudh Sangh
Gokul Dudh SanghSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. आता अध्यक्ष निवडीवरून मोठी खलबते होताना दिसत आहेत. दरम्यान, एकीकडे अध्यक्ष निवडीवरून पुन्हा राजकीय रणकंदन होण्याची शक्यता असतानाच, दुसरीकडे गोकुळ प्रशासनाने तब्बल 350 कर्मचाऱ्यांच्या विरोधात मोठे पाऊल उचलले आहे. या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे गोकुळमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी संचालकांची कोरम बैठक महत्त्वाची असून, 14 संचालक उपस्थित राहणे गरजेचे आहे. तर राजर्षी शाहू समविचारी शेतकरी आघाडीकडे 13 चे बहुमत आहे. मात्र, कोरमच्या मुद्द्यामुळे सत्तांतर होऊनही राजर्षी शाहू समविचारी शेतकरी आघाडीचा अध्यक्ष होणे कठीण दिसत आहे.

यावरून आमदार सतेज पाटील यांनी, जिल्ह्यातील 5.5 लाख शेतकऱ्यांनी आम्हाला बहुमत दिले असून, कोरमचा मुद्दा उपस्थित न करता महायुतीच्या संचालकांनी सभेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. तरीही अद्याप महायुतीचे संचालक कोरमच्या बैठकीला उपस्थित झालेले नाहीत. यामुळे आजची कोरम बैठकच तहकूब करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अध्यक्षपदावरून नवा ट्विस्ट निर्माण झाल्याचे सध्याचे चित्र असून, जिल्ह्यात पुन्हा एकदा गोकुळवरून रण तापण्याची शक्यता आहे.

Gokul  Dudh Sangh
Gokul Politics : एका पत्रकामुळे गोकुळमधील महायुतीचे मतभेद अन् मनभेद चव्हाट्यावर : विद्यमानांचा पत्ता कट करण्यासाठी बैठका

अशातच गोकुळ प्रशासनाने तब्बल 350 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, नेमके कारण काय, असा सवाल केला जात आहे. दरम्यान, याचे कारणदेखील आता समोर आले असून, निवडणूक प्रचारात सहभागी होण्यासाठी विनापरवाना गैरहजर राहिल्याचा ठपका या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने ठेवला आहे.

गोकुळच्या निवडणुकीदरम्यान 1 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत हे कर्मचारी रजा मंजूर करून न घेताच गैरहजर राहिल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला आहे. यामध्ये डेअरी आणि पशुखाद्य विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला असून, इतर कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताणही वाढल्याचे समोर आले आहे.

Gokul  Dudh Sangh
Gokul Politics : 'गोकुळ'मधील महायुतीचा सस्पेन्स मुख्यमंत्री संपवणार, जागावाटपाचा फाॅर्म्युला ठरला? बैठकीत काय घडलं?

यामुळे आता या प्रकाराची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून, तब्बल 350 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागवण्यात आला आहे. दरम्यान, आता संबंधित कर्मचाऱ्यांकडून कोणता खुलासा केला जातो आणि त्यानंतर प्रशासन पुढे काय कारवाई करते, याकडे जिल्ह्यासह संबंधित कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com