Gokul Milk Union: गोकुळ दूध संघाच्या सत्तेचा आज दुपारपर्यंत फैसला; शासन नियुक्त संचालक अन् अध्यक्षपदाचा तिढा सुटणार!

Gokul Milk Union government appointed director : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाबाबत आज दुपारपर्यंत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. शासन नियुक्त संचालक आणि अध्यक्षपदाचा तिढा सुटणार का? जाणून घ्या ताजे अपडेट.
Gokul chairman election in political tussle
Gokul chairman election in political tussle Sarkarnama
Published on: 
Updated on: 

गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या गोकुळ दूध संघाच्या सत्ता संघर्षाचा निकाल आज दुपारपर्यंत लागणे शक्य आहे. कोरम अभावी निर्माण झालेल्या पेचामुळे महायुतीकडून चार शासन नियुक्त संचालकांच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देऊन समविचारी आघाडीकडून अध्यक्ष पदाला देखील आव्हान देण्यात आले आहे.

त्याची महत्त्वाची सुनावणी आज दुपारी तीन वाजता पार पडणार आहे. गोकुळच्या सत्ता संघर्षात न्यायालयाची बाजू आणि निकाल महत्त्वाची असून आज कोल्हापूर सर्किट बेंच काय निकाल देणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

10 नोव्हेंबर रोजी गोकुळ दूध संघाची दुसरी सभा पार पडली. या सभेत राज्य सरकारकडून चार शासन नियुक्त संचालकांची निवड करून त्यांना मतदानाचा अधिकार दिला. समविचारी आघाडीचे बहुमत असून देखील अध्यक्षपदापासून वंचित रहावे लागले. सभेच्या गणपूर्तीसाठी 14 संचालकांची आवश्यक असल्याने महायुतीकडे देखील बारा संचालक होते. त्यामुळे शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देऊन 10 नोव्हेंबरच्या सभेत महायुतीचे राजेश पाटील हे अध्यक्ष झाले.

Gokul chairman election in political tussle
NMC Recruitment 2026 : नाशिक महापालिकेत 204 पदांसाठी मेगाभरती; महिन्याला 1.10 लाखांपर्यंत पगार, असा करा अर्ज!

तत्पूर्वी राज्य सरकारच्या या आदेशाला समविचारी आघाडी कडून आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच येथे आव्हान देण्यात आले

यापूर्वी न्यायालयाकडून निकाल देत असताना न्यायालयाकडून होणाऱ्या अंतिम निकालाला अधीन राहून अध्यक्ष निवडणूक सभा झाली असल्याने आज होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान कोल्हापूर सर्किट बेंच येथे दुपारी तीन वाजता या संदर्भात सुनावणी होणार आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत मुकुल रोहतगी यांनी राज्य सरकाराची बाजू मांडली होती.