Gokul Dairy: गोकुळ निवडणुकीत भाजपने गेम फिरवला : बंटी पाटील, प्रकाश आबिटकर, विनय कोरेंना मोठा धक्का

Gokul Election, BJP Strategy, Kolhapur Politics: गोकुळ दूध संघ निवडणुकीत भाजपच्या रणनीतीमुळे अनेक दूध संस्था अपात्र ठरल्या. याचा फटका राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य शक्ती तसेच सतेज पाटील गटाला बसण्याची शक्यता आहे.
BJP changes equation in Gokul election
BJP changes equation in Gokul electionSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Gokul dairy election news: यंदाची गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती म्हणून राष्ट्रवादी, भाजप, जनसुराज्य शक्ती आणि शिवसेना एकत्र लढणार आहे. भाजपने मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा आता काढला आहे.

अवसायानात निघालेल्या १३२० संस्थांपैकी आत्तापर्यंत ४४१ दूध संस्था अपात्र ठरल्या आहेत. शिवाय उर्वरित संस्थांमधील जवळपास दीडशेहून अधिक संस्था अपात्र ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे. जवळपास ६६५ इतक्या दूध संस्था अपात्र होण्याच्या मार्गावर असल्याने राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य शक्तीला मोठा फटका बसला आहे.

मागील निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत एकत्र राहणाऱ्या या तिन्ही पक्षांच्या नव्या संस्थाबद्दल तक्रार देणाऱ्या प्रकाश बेलवाडे यांना भाजपमधील अदृश्य शक्तीने पाठिंबा दिल्याने मागील निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढल्याची चर्चा गोकुळ दूध संघाच्या राजकारणात सुरू आहे.

BJP changes equation in Gokul election
Maharashtra News Live Update: अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,10 लाख टन कांदा...

यंदाची निवडणूक ही महायुती म्हणून एकत्र लढायचे निश्चित झाल्यानंतर नियमावर बोट ठेवत दुग्ध निबंध कार्यालयाकडून या संस्थांना अपात्र करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती पक्षासोबतच काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या गटाला देखील धक्का बसला आहे.

अवसायनातील संस्थांच्या अपात्रतेमुळे मतांची फेरजुळणी करावी लागणार आहे. पहिल्याच टप्प्यात ४४१ संस्था अपात्र ठरल्या आहेत. यामध्ये उर्वरित संस्थांमधून आणखी शंभर-दीडशे संस्थांची भर पडणार आहे. त्यामुळे या मतांसाठी नेत्यांना फेरजुळणी करावी लागणार आहे. अपात्र संस्थांच्या आकडेवारीत पालकमंत्र्यांच्या भुदरगड तालुक्यातील सर्वाधिक १०१ संस्थांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यात ज्या त्या ठिकाणी तेथील स्थानिक नेत्याचे वर्चस्व आहे.

BJP changes equation in Gokul election
Gokul Election : कोल्हापुरमध्ये महायुतीला झटका : 'गोकुळच्या' जागावाटपाचा अंदाज येताच राष्ट्रवादीचा नेता सतेज पाटलांना साथ देण्याच्या तयारीत

मतदानाच्या आधीच्या दिवसापर्यंत अपात्र संस्थांना न्याय मिळवून देणार असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांना असला तरीही त्यासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी या संस्थांना वगळूनच मतांची जुळणी करावी लागणार आहे.

भुदरगड, गडहिंग्लज, शाहूवाडी, पन्हाळा या तालुक्यातील संस्थांची संख्या पहिल्या टप्प्यात तरी अधिक आहे. यामुळे तेथील नेत्यांना त्यांच्या या मताची जुळणी करावी लागणार आहे. काही माजी संचालकांच्याही संस्थांना येथे फटका बसला आहे. ज्यांच्याकडे अधिक ठराव त्यांना उमेदवारी असा निकष महायुतीत ठरल्याचे सांगण्यात येते.

त्यामुळे प्रत्येक नेत्याला त्यांच्या संचालकांकडे अधिक ठराव कसे येतील याकडे लक्ष द्यावे लागत आहे. त्यामुळे भुदरगडमध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर, पन्हाळा-शाहूवाडीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे, करवीर-गडहिंग्लज मध्ये आमदार सतेज पाटील आणि चंद्रदीप नरके यांनाही फटका बसू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com