Gokul news: 'गोकूळ'मध्ये राजकीय खेळी करणाऱ्यांना शौमिका महाडिकांनी सुनावले खडेबोल; काय म्हणाल्या...

Shoumika Mahadik on Gokul Election News: गोकुळ दूध संघातील 410 संस्थांना नोटीस प्रकरणावर शौमिका महाडिक आक्रमक. संस्थाचालकांना भडकवू नका, राजकीय भांडवल करू नका, असा विरोधकांना इशारा.
Shoumika Mahadik
Shoumika MahadikSarkarnama
Published on
Updated on

kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. प्रारूप मतदार यादी समोर येण्यापूर्वी एसआयटी चौकशीतील 410 दूध संस्थांना आपले सभासदत्व रद्द का करू नये, अशी नोटीस प्रशासकांनी बजावली आहे.

या नोटीसी नंतर संस्थाचालकांनी एकत्र येत शनिवारी दूध संघावर मोर्चा काढला. त्यावर आज भाजपकडून गोकुळ दूध संघाच्या प्रशासकांना निवेदन देत गोकुळ संचालिका शोमिका महाडिक पडद्यामागून राजकीय खेळी करणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

एसआयटी चौकशीनंतर ज्या 410 संस्थाना नोटीसा दिल्या आहेत. पण त्यासंदर्भात कोणता निर्णय घेतलेला नाही. म्हणणे, मांडण्यासाठी 22 जुलैपर्यंत वेळ दिला आहे. चर्चेशिवाय कोणताही निर्णय होणार नाही, असे असताना काही दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते कोणाच्या तरी सांगण्यानुसार गोकुळवर मोर्चे काढले.

या संस्थाचे दूध गोकुळकडे येत असेल तर त्यांना उपविधी प्रमाणे ब वर्ग दर्जाचे सभासद मिळेल. त्यांचा गोकुळशी संबंध तुटणार नाही. मात्र मतदानाचा अधिकार असणार की नाही याबाबत प्रशासक ठरवतील. नियमानुसार जे आहे ती कारवाई करावी याबाबत आपण निवेदन दिले आहे.

Shoumika Mahadik
Maharashtra Education: आता शिक्षकांच्या कामावर व्हॉट्सॲपवरून नजर! शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, प्रत्येक जिल्ह्यात 'विषय समित्या'

अनेकजण म्हणत आहेत की यांचे सभासद व रद्द केले तर गोकुळला आर्थिक फटका बसेल. शिवाय संस्थांवर उपासमारीची वेळ येईल. पण कोणत्याही संस्थांवर उपासमारीची वेळ येणार नाही. गोकुळ दूध संघाबाबत अशा संस्थांचा आर्थिक व्यवहार चालू राहील. या संस्था ब वर्गातील राहतील.राजकीय हस्तक्षेप नाही वाढवला तर प्रशासन चांगले काम करेल. प्रशासक आणि संस्थांमध्ये समन्वय घडवण्याचा काम राजकीय लोकांचे आहे. संस्थांना प्रशासकांच्या विरोधात भडकवून हे राजकीय लोकांचं काम नाही, असे खडे बोल देखील महाडिक यांनी सुनावले.

Shoumika Mahadik
Monsoon Session 2026 : संसदेत आजपासून घमासान! राम मंदिर दान चोरी, नीट पेपरफुटी, इथेनॉलवरून विरोधक सरकारला घेरणार

गोकुळच्या संस्थांचे राजकीय भांडवल करू नका. जी लोक नव्याने महायुतीमध्ये आली आहेत.आपण काहीतरी बोललो म्हणजे नेते खुश होतील.अशी लोक याचा राजकीय भांडवल करत. असही त्या म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com